नागपूर : महालेखाकार कार्यालयामार्फत भविष्यनिर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक विवरणपत्र sevaarth.mahakosh.gov.in या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी विवरणपत्राची प्रिंट काढून जमा अभिदान व इतर वैयक्तिक माहितीच्या बाबी तपासून घ्याव्या व त्यात तफावत असल्यास सुधारेणेसाठी सेवार्थ आयडीसह gpftakrarngp@gmail.com या ईमेल किंवा फॅक्स क्रमांक ०७१२- २५६०४८४ वर पाठवाव्या. तसेच भविष्य निर्वाह निधीमध्ये प्रत्येक महिन्यात जमा होणारे अभिदानचा संदेश मिळविण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी सेवार्थ आयडीसह त्यांचा मोबाईल क्रमांक, पूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक fm.mh2.ae@cag.gov.in या ई-मेलवर पाठवून नोंदणी करावी,असे आवाहन प्रधान महालेखाकार, नागपूर यांनी केले आहे.
भविष्यनिर्वाह निधीचे विवरणपत्र, महालेखाकार कार्यालयाची काय आहे सूचना?
महालेखाकार कार्यालयामार्फत भविष्यनिर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक विवरणपत्र sevaarth.mahakosh.gov.in या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 10-08-2023 at 19:39 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accountant general s office suggestion for provident fund statement cwb 76 zws