लोकसत्ता टीम
वर्धा : दुर्दैव म्हणावे की काळाने उगवलेला सूड, असा प्रश्न या घटनेत पडावा. लग्नाचे आमिष देत अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवीस वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आले होते.
तशी तक्रार तिवसा पोलीसांकडे करण्यात आली.मात्र घटनेचे स्थळ वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीसांच्या अधिकारात येत असल्याने हे प्रकरण वर्धा पोलीसांकडे सोपविण्यात आले. शेवटी १८ सप्टेंबरला सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तालुक्यातील कामठी येथील चंद्रशेखर शेळके याने सदर युवतीला लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध ठेवले. मात्र पिडीत युवतीस गर्भधारणा झाली.
आणखी वाचा-‘तुझ्याशी लग्न करायचंय, कुणी विरोध केल्यास त्याला…’, एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकी
तिने बाळाला जन्म दिला. हे झाल्यावर मात्र आरोपी शेळके याने लग्नास नकार दिल्याने तक्रार झाली होती. पण ज्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच दिवशी आरोपी शेळके याचा एका अपघातात मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.