जुन्‍या वैमनस्‍यातून आरोपीने घरासमोर बसलेल्‍या एका कुटुंबातील सहा जणांना चार चाकी वाहनाने चिरडल्‍याची धक्‍कादायक घटना दर्यापूर तालुक्‍यातील नाचोना येथे मंगळवारी रात्री उशिरा घडली. गावातीलच अवैध दारू विक्रेत्‍याने हा हल्‍ला केल्‍याची माहिती आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्‍यू झाला असून अन्‍य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> १४ कोटीचा गृहकर थकीत.. – वेकोलीच्या पोवणी सब एरिया ऑफिसला कुलूप ठोकले

अनुसया श्‍यामराव अंभोरे (६५), श्‍यामराव लालूजी अंभोरे (७०) आणि अनारकली मोहन गुजर ( ४३) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत शारदा उमेश अंभोरे (३६), उमेश अंभोरे (४२) आणि किशोर श्‍यामराव अंभोरे ( ३८) हे जखमी झाले आहेत.अंभोरे कुटुंबीयांचा गावातीलच अवैध दारू विक्री करणा-या व्‍यक्‍तीसोबत त्‍यांचा वाद आहे. आपल्‍या दारू व्‍यवसायाची माहिती अंभोरे कुटुंबीय पोलिसांना देत असल्‍याचा संशय त्‍याला होता. यामुळे सुडाने पेटलेल्‍या दारू विक्रेत्‍याने मंगळवारी रात्री अंभोरे कुटुंबीयांच्‍या घरासमोर चारचाकी वाहन आणले आणि घरासमोर उभे असलेल्‍या सहा जणांच्‍या अंगावर नेले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्‍यू झाला. आरोपीने घटनास्‍थळीच वाहन सोडून पळ काढला. जखमींवर दर्यापूर येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.