अपंग महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पीडिता जबाब देण्यास असमर्थ असणे, साक्षीदार दोन महिला नातेवाईक फितूर होणे, तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदवलेल्या साक्षी, जलदगती सुनावणी, गुन्हेगारांना जरब बसेल असा कठोर निकाल, ही या खटल्याची वैशिष्ट्ये ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> न्यायालयाला गृहीत धरणे धक्कादायक ; बंडखोर आमदारांच्या दाव्यावर जयंत पाटलांची टीका

गेल्या १८ जुलै २०२१ रोजी निमगाव गुरू (देऊळगाव राजा) येथे ही घृणास्पद घटना घडली. मूक-बधिर, दोन्ही पायांनी अपंग असलेल्या महिलेवर दिलीप संपत भालेराव याने अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासांती दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. एन. मेहरे यांच्या समक्ष ११ साक्षी सादर करण्यात आल्या. २ नातेवाईक महिला फितूर झाल्या, मात्र तज्ज्ञ डॉक्टर, तपास अधिकारी यांच्या साक्षी व विशेष सरकारी वकील सोनाली सावजी-देशपांडे यांच्या प्रभावी युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी निकाल दिला. आरोपीला मरेपर्यंत सश्रम कारावास, जन्मठेप व १ हजार दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.