देवेश गोंडाणे

नागपूर : Talathi recruitment exam 2023 नाशिक येथील परीक्षा केंद्रावरून तलाठी परीक्षेचा पेपर फुटल्याचे भूमी अभिलेख विभागाने खंडन केले असले तरी या प्रकरणातील आरोपीकडे प्रश्नपत्रिकेची तब्बल १८५ छायाचित्रे सापडल्याचे समोर आले आहे. यामुळे उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर फोडल्याचे दिसून येत असून, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन

 सध्या ३० जिल्ह्यांतील ११५ टीसीएस केंद्रांवर तलाठी भरतीची परीक्षा सुरू आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १७ ऑगस्टला नाशिक येथील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबईझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर ऑनलाइन परीक्षा सुरू असताना गणेश श्यामसिंग गुसिंगेला या आरोपीला अटक करण्यात आली. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर फोडणारी उपकरणे पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या प्रथम माहिती अहवालानुसार, या आरोपीकडे प्रश्नपत्रिकेची तब्बल १८६ छायाचित्रे सापडली आहेत. यात असलेले सर्व प्रश्न हे १७ तारखेला झालेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आल्याची खात्री त्यादिवशी परीक्षा देणाऱ्यांकडून करण्यात आली आहे. असे असतानाही राज्य सरकार पेपर फुटलाच नसून, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘हायटेक कॉपी’ कशी होते?

उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून प्रश्नपत्रिका प्रसारित केली जाते. ती सर्वत्र पाठवून त्याची उत्तरेही या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मागवली जातात. याचे मोठे रॅकेट राज्यात आहे. परीक्षा देणारा एक विशिष्ट उमेदवार ‘बटन कॅमेऱ्या’द्वारे पेपरचे छायाचित्र काढून ब्लुटूथच्या माध्यमातून बाहेर पाठवतो. बाहेरील मंडळी या प्रश्नपत्रिकांवरून उत्तरे तयार करून पैसे देणाऱ्या उमेदवारांना पाठवतात. यासाठी अनेकदा संबंधित परीक्षा केंद्र संचालकालाशी संगनमन केले जाते, हे याआधीच्या काही पेपरफुटीच्या घटनांवरून समोर आले आहे.

परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी

पुणे : तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांना कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर जाताना करण्यात येणाऱ्या तपासणीत इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्यास संबंधित उमेदवारांवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याचा इशारा भूमी अभिलेख विभागाने दिला आहे.

तलाठी परीक्षेचा पेपर पहिल्याच दिवशी फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही सुचवलेल्या उपाययोजना महसूल विभागाने अमलात न आणल्याने हा प्रकार घडला. नवीन उपाययोजना अमलात आणून तलाठी परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करावे. आम्ही लवकरच न्यायालयात दाद मागणार असून, राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहोत. – नीलेश गायकवाड, सचिव, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.

Story img Loader