नागपूर: व्यापाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांडातील एक आरोपी ओंकार तलमलेवर १११ तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून ५.३१ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, ओंकार आणि अश्विन वानखेडे हे दोघेही ढोलताशा पथकामध्ये असल्यामुळे एकमेकांना ओळखत होते. ओंकारने तो नासामध्ये कनिष्ठ वैज्ञानिक या पदावर कार्यरत असल्याचे अश्विनला सांगितले. सध्या नागपुरातील रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर येथे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून ते भरायचे असल्याचे त्याने अश्विनला सांगितले.

हेही वाचा… नागपूर : थेट उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीतच गडकरींनी सादर केले राष्ट्रसंताचे ‘ते’ प्रसिद्ध भजन

संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असून तेथे नोकरी लावून देणे शक्य असल्याचे आमिष दाखवले. त्यासाठी २ लाख रुपये भरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. हे पैसे आरोपीने त्याच्या बँक खात्यात भरायला सांगितले. आणखी कुणी नातेवाईक-मित्र असल्यास त्यांनाही नोकरी लावून देण्याचे सांगून एकूण १११ बेरोजगारांकडून तब्बल ५ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये विविध पद्धतीने घेतले.

हेही वाचा… चंद्रपूर : एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी ५० एकर जमीन प्रदान, सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान, नोकरी लागत नसल्याने अश्विनने संबंधित कार्यालयात जाऊन विचारणा केली असता या पद्धतीने कोणतेही ऑफिस स्टाफ घेतले जात नसून आपली फसवणूक झाल्याचे कळले. त्यानंतर त्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ई-मेलवर खोटे नियुक्तीपत्र

ओंकारने अनेक बेरोजगारांकडून २ लाख रुपये उकळून त्यांच्या ई-मेलवर रिजनल रिमोट सेंन्सिग, वाडीच्या नावाने खोटे नियुक्ती पत्र पाठवल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. हे पत्र बनावट असल्याचे नंतर उघड झाले.