नागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर जामठाजवळील जंगलात नेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला अखेर बेलतरोडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपवले आहे. हिंगणा पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे एवढ्या दिवस आरोपी फरार होता, हे विशेष. गेल्या ४ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता यवतमाळवरून नागपुरात आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला जामठ्याजवळ एका आरोपीने अडविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भरती! सार्वजनिक बांधकाम विभागात दोन हजारांवर जागा, मात्र पात्रता…

तिला कुऱ्हाडीचा धाक दाखवून बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीच्या माहितीवरून आरोपी युवकाचे रेखाचित्र तयार करण्यात आले होते. आरोपीच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त करण्यात आले होते. मात्र, ‘स्मार्ट’ असलेल्या नागपूर पोलिसांना आरोपी गवसला नाही. गुन्हे शाखेच्या पथकेही कुचकामी ठरली होती. आरोपीच्या शोध घेण्यात अपयश येताच आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा पोलिसांनी केली. शेवटी बेलतरोडीचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांच्या पथकाला संशयित आरोपी गवसला. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याला पुढील चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused in engineering student rape case arrested from beltarodi area adk 83 zws
Show comments