चंद्रपूर : बनावट देशी दारूचा कारखाना प्रकरणातील फरार आरोपीने उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच आत्महत्येचा हा प्रयत्न झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. राजू श्यामराव मडावी (२६, रा. बाबुपेठ) असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विशेष म्हणजे, आरोपी राजू हा शरण जाण्याच्या उद्देशाने कार्यालयात गेला असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली. यानंतर जिल्ह्यात बनावट दारू विक्री करणारे रॅकेटसुद्धा सक्रिय झाले. मूल तालुक्यातील चितेगाव येथील एका शेळीपालन केंद्रावर बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून अवैध दारू तयार करण्याचा कारखाना उधळून लावला. या प्रकरणात गुरू संग्रामे (पोलिस पाटील) आणि उमाजी झाडे या दोघांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. तर, पवन वर्मा, अरुणा मरस्कोल्हे व राजू मडावी हे तिघे घटनेनंतर फरार झाले. या तिघांचा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून शोध सुरू होता. परंतु, पंधरा दिवस लोटूनही हे तिघे हाती लागले नाही.

हेही वाचा – चंद्रपूर : ‘आम्हाला दुसरे शिक्षक द्या हो…’, विद्यार्थ्यांचे भर उन्हात रास्ता रोको आंदोलन

उत्पादन शुल्क विभागाने फरार आरोपींच्या शोधासाठी पथके गठीत करून तपास सुरू केला. फरार आरोपी राजू मडावी याच्यासह बाबुपेठ परिसरातील कार्तीक घोटेकर याचेही नाव या प्रकरणात समोर आले. वरोरा येथे चायनिजच्या दुकानात काम करणाऱ्या आरोपी राजूचा भाऊ सुरेश मडावी यालासुद्धा पोलिसांनी उचलून नेत बेदम मारहाण केली. तसेच, गौरव निदेकर (वय २३, रा. बाबुपेठ) यालासुद्धा पोलिसांनी तपासाच्या नावाखाली मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : रानडुक्कराच्या धडकेत अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

बनावट देशी दारूचा कारखाना चालविणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात फरार आरोपींना जामीन मिळूच शकत नाही. त्यामुळे त्या तिघांची अटक ही अटळ आहे. त्यामुळे आरोपी राजू मडावी याने हे सर्व नाट्य स्वत: घडवून आणले आहे. कार्यालयात आल्यानंतर त्याला कुणीही मारहाण केलेली नाही. एवढेच नाही, तर त्याने कार्यालयात उंदीर मारण्याचे विष घेतले नसून, तो बाहेरच कुठेतरी विष प्राशन करून आला. या सर्व प्रकारातून तपासाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न आहे. या घटनेचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज उपलब्ध असून, या संबंधीची माहिती जिल्हाधिकारी, तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.