लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वर्धा : गुन्हेगाराची हिंमत वाढली की तो कोणत्या थराला जाईल याचा नेम नसतो. थेट पोलीस उपनिरीक्षकास मारहाण करणाऱ्या एका गुन्हेगाराची हिंमत पाहून पोलीस खातेही चक्रावून गेले आहे.
सेवाग्रामलगत करंजी काजी येथील ही घटना आहे. येथील हर्षल नेहारे याच्याकडे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच त्याने गावात पिस्तूलने मारण्याची धमकी दिल्याची चर्चा होती. ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक शिवराज कदम, पोलीस शिपाई संजय लाडे, चालक कोमल हे शासकीय वाहनाने करंजी काजी या गावात पोहचले. तेव्हा हर्षल नेहारे हा घरीच असल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांना पाहून त्याने वेगळाच पवित्रा घेतला. पोलीस पाहून त्याने जमिनीवर हातपाय आपटायला सुरवात केली. ओरडू लागला. तसेच जोरजोरात पोलिसांना शिवीगाळ करणे सुरू केले. त्याचे हे रूप पाहून पोलीस अचंबित झाले. पण, आरोपीस ताब्यात घ्यायचेच होते. म्हणून पोलीस उपनिरीक्षक शिवराज कदम यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले.
आणखी वाचा-पावसाचे पाणी घरात शिरल्याने संताप, नागपुरात माजी नगरसेवकाला चोप
तसेच समजही दिली. पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. आक्रमक झाला. लाता बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. कदम यांना जखमी केले. कदम यांना ढकलून देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनीही त्यास पकडण्याचा पक्का निर्धार केलाच. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. ते उपस्थित पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. आरोपी व शस्त्र सेवाग्राम पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस निरीक्षक कदम यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. आरोपी हर्षल घनश्याम नेहारे, याच्यावर शासकीय कर्तव्यास बाधा आणणे व अन्य कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. आता या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला हे करीत आहेत.
आणखी वाचा-नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी
या घटनेची पोलीस वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. आरोपी हर्षल याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने पिस्तूल कुठून आणले, तो कोणाला मारण्याची धमकी देत होता, यापूर्वी त्याने गावात किंवा अन्य ठिकाणी धमकी देण्याचे प्रकार केलेत का, याची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी दाखविलेल्या धाडसाची प्रशंसा होत आहे. आरोपी नेहारे याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले असून त्याने अटक करताना दाखविलेला विक्षिप्तपणा चर्चेचा विषय ठरला आहे.