लोकसत्ता टीम

नागपूर: प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर प्रेयसीला हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. नंतर तिचा बळजबरीने गर्भपात करून लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून कोंढाळी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. साहिल कमलेश यादव (२७, बाजारगाव) असे आरोपीचे नाव आहे.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षीय तरुणीशी साहिलची ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विश्वासात घेऊन वारंवार प्रेमाची मागणी घातली. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपूर्वी तिला जेवण करण्याच्या बहाण्याने बाजारगावमधील अनंततारा हॉटेलमध्ये नेले. जेवण झाल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा… अमरावती : बच्‍चू कडूंनी चांदूर बाजार राखले, पण अचलपुरात हादरा; बाजार समित्‍यांमध्‍ये महाविकास आघाडीचा दबदबा

त्यानंतर त्याने जुनापाणी येथील एका ढाब्यावर जेवण करायला जायचे सांगून जंगलात नेऊन बलात्कार केला. तसेच नागपुरातील काही हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली.

हेही वाचा… वाशीम : बाजार समित्यांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची ‘एन्ट्री’, भाजपाला धक्का, तर महविकास आघाडीने गड राखले

तिने गर्भवती असल्याचे सांगून लग्नाचा तगादा लावला. तिला लग्न करण्यासाठी गर्भपात करायला भाग पाडले. तिचा बळजबरीने गर्भपात केला. त्यानंतर लग्नास नकार दिला. तरुणीने वारंवार लग्नाबाबत विचारणा केली असता साहिलने तिला नकार दिला. त्यामुळे तरुणीच्या तक्रारीवरून कोंढाळी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Story img Loader