लोकसत्‍ता टीम

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका‎ तरुणीची अकोल्यातील तरुणासोबत समाज माध्‍यमावर ओळख झाली. यातूनच‎ त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. दरम्यान, तरुणाने‎ पीडित तरुणीची आक्षेपार्ह चित्रफीत काढून तिला‎ शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर तरुणीवर‎ बलात्कार केला.

Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Robbers snatched the girl phone from outside the house video goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; मोबाईल चोरी करण्याची “ही” नवी पद्धत पाहा आणि आत्ताच सावध व्हा
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
a man urinating near the gate of his car in heavy traffic on a road
Video : सुजाण नागरीकाला हे वागणं शोभतं का? ट्रॅफिकमध्ये गाडीतून उतरला, दार उघडे ठेवून केले नको ते कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून‎ पोलिसांनी अकोल्याच्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.‎ रोशन संतोष देशमुख (रा. अकोला) असे‎ गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रोशन व‎ पीडित तरुणी यांची समाज माध्यमावर ओळख‎ झाली. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्‍या ९‎ एप्रिलला रोशनने तरुणीला भेटीसाठी बोलावले,‎ तरुणी भेटायला गेल्यानंतर त्याने तरुणीला‎ शरीरसुखाची मागणी केली. तिने त्यासाठी नकार‎ दिला तर त्याने बळजबरीने तरुणीची आक्षेपार्ह‎ चित्रफीत तयार केली.

हेही वाचा…. बुलढाणा : साखरखेर्ड्यात तणाव; प्रक्षुब्ध जमावाची पोलीस ठाण्यावर धडक, पोलिसांचा सौम्य लाठीमार

हेही वाचा…. नागपूर : ‘ये उलटी खोपडी के लोग’; संजय राऊत यांचा खोपडेंना टोमणा

त्यानंतर ११ एप्रिलला पीडित‎ तरुणी पुन्हा रोशनला भेटण्यासाठी अकोला येथे‎ गेली. त्यावेळी एका शेतात तिच्यावर बलात्कार‎ केला. त्यावेळीसुद्धा त्याने अश्लील छायाचित्र व‎ चित्रफीत काढली असावी, असा संशय पीडितेला‎ आहे. दरम्यान, तरुणीने त्या तरुणाला लग्नाबाबत‎ विचारणा केली असता, त्याने नकार दिल्याचेही पीडितेने‎ पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.‎ दरम्यान, या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी‎ तरुणाविरुद्ध बलात्कार तसेच विनयभंगाचा गुन्हा‎ दाखल केला आहे.

Story img Loader