लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीची अकोल्यातील तरुणासोबत समाज माध्यमावर ओळख झाली. यातूनच त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. दरम्यान, तरुणाने पीडित तरुणीची आक्षेपार्ह चित्रफीत काढून तिला शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर तरुणीवर बलात्कार केला.
या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकोल्याच्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रोशन संतोष देशमुख (रा. अकोला) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रोशन व पीडित तरुणी यांची समाज माध्यमावर ओळख झाली. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या ९ एप्रिलला रोशनने तरुणीला भेटीसाठी बोलावले, तरुणी भेटायला गेल्यानंतर त्याने तरुणीला शरीरसुखाची मागणी केली. तिने त्यासाठी नकार दिला तर त्याने बळजबरीने तरुणीची आक्षेपार्ह चित्रफीत तयार केली.
हेही वाचा…. बुलढाणा : साखरखेर्ड्यात तणाव; प्रक्षुब्ध जमावाची पोलीस ठाण्यावर धडक, पोलिसांचा सौम्य लाठीमार
हेही वाचा…. नागपूर : ‘ये उलटी खोपडी के लोग’; संजय राऊत यांचा खोपडेंना टोमणा
त्यानंतर ११ एप्रिलला पीडित तरुणी पुन्हा रोशनला भेटण्यासाठी अकोला येथे गेली. त्यावेळी एका शेतात तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळीसुद्धा त्याने अश्लील छायाचित्र व चित्रफीत काढली असावी, असा संशय पीडितेला आहे. दरम्यान, तरुणीने त्या तरुणाला लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने नकार दिल्याचेही पीडितेने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी तरुणाविरुद्ध बलात्कार तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.