अमरावती : परसबागेत लावलेले वेल शेळीने‎ खाल्ल्याच्या वादातून एकाने वृद्ध‎ शेजारी शेळी मालकावर कुऱ्हाडीने‎ वार करून त्याची हत्‍या केली. ही‎ घटना सात वर्षांपूर्वी वलगाव‎ ठाण्याच्या हद्दीतील विर्शी गावात‎ घडली. या प्रकरणी येथील जिल्हा‎ न्यायाधीश (क्रमांक २) पी.जे.‎ मोडक यांच्या न्यायालयाने‎ आरोपीला आजन्म कारावासाची‎ शिक्षा सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधी सूत्रांनी दिलेल्या‎ माहितीनुसार, आनंदराव‎ सुखदेवराव बडक (५८, रा. विर्शी)‎ असे शिक्षा झालेल्या आरोपीचे तर‎ हरिभाऊ शेंद्रे (६५, रा.विर्शी) असे‎ मृताचे नाव आहे. १८ सप्टेंबर, २०१६‎ रोजी सकाळी नऊ वाजेच्या‎ सुमारास भातकुली तालुक्यातील‎ विर्शी येथे ही घटना घडली होती.‎ हरिभाऊ शेंद्रे हे त्यांच्या मालकीच्या‎ शेळ्या घेऊन चरण्यासाठी घेऊन‎ जात होते. त्याचदरम्यान रस्त्यात‎ आनंदराव बडक याच्या परसबागेत‎ असलेल्या कोहळा व वालाचे वेल‎ शेळ्यांनी खाल्ले. ‘तुझ्या बकरीने‎ माझ्या परसबागेतील वेल खाल्ले,‎ त्याची भरपाई कोण देणार, थांब‎ तुला जिवाने मारून टाकतो,’ असे‎ म्हणत आनंदराव बडकने हरिभाऊ‎ यांच्या डोक्यात व पायावर‎ कुऱ्हाडीने वार केले. आरडाओरड‎ होताच आरोपी तेथून पळून गेला.‎ जखमी हरिभाऊ यांना गावातील‎ नागरिकांनी तातडीने जिल्हा‎ सामान्य रुग्णालयात व तेथून‎ उपचासाठी खासगी रुग्णालयात‎ हलवले होते. प्रकृती‎ खालावल्यामुळे त्यांना नागपूरला‎ हलवण्यात आले. मात्र, नागपूर येथे‎ त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – गडचिरोली : ना दुभत्या गायी मिळाल्या ना पैसे! भामरागड आदिवासी प्रकल्प कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात

या प्रकरणी‎ वलगाव पोलिसांनी सुरुवातीला‎ प्राणघातक हल्ला करणे व‎ हत्‍येच्‍या कलमान्वये गुन्हा‎ दाखल केला. या प्रकरणाचा तपास‎ वलगावचे तत्कालीन ठाणेदार‎ दत्तात्रय गावडे यांनी करून‎ दोषारोपपत्र दाखल केले होते. या‎ प्रकरणी अतिरिक्त सरकारी‎ अभियोक्ता अ‍ॅड. कौस्तुभ लवाटे‎ यांनी एकूण दहा साक्षीदार तपासले.‎ घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार व सरकारी‎ पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून‎ न्यायालयाने आरोपी आनंदराव‎ बडक याला हत्येप्रकरणी दोषी‎ ठरवून शिक्षा सुनावली.‎