आम्ही सोन्याचे दागिने चमकवून देतो अशी खात्री महिलेला पटवून दिली आणि दागिने चमकविण्याच्या बहाण्याने महिलेकडील २५ हजार रूपये किमतीचे दागिने घेवून आरोपी पसार झाल्याची घटना साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथे घडली. पल्सर मोटारसायकलने पसार झालेल्या या चोरट्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>>स्रोत प्रदूषित झाल्याने शुद्ध जल मिळणे कठीण, काय म्हणतात जलतज्ज्ञ?

सेंदुरवाफा येथील लता विजय मसराम(३५) ही महिला घरी असताना अंदाजे २५ ते ३५ वयोगटातील तीन तरूण त्यांच्या घरी गेले. तुमच्याकडील सोन्याचे दागिने साफ करून चमकवून देतो असे सांगितले. महिलेने घरातील डोरले व सोन्याचे मणी त्यांच्याकडे दिले. आरोपींनी त्यांच्या महिलेला घरातून हळद आणण्यास सांगितले. लता हळद आणण्यासाठी आत जाताच दागिने घेवून आरोपी पसार झाले. याप्रकरणी साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Story img Loader