लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फोडणारा आरोपी गणेश गुसिंगे याच्यासंदर्भात नवीन खुलासा समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत तो उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला १३८ गुण प्राप्त झाले. आरोपी उमेदवार उत्तीर्ण झाल्याने भरतीप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा-गोंदिया : कावडमधील तांब्यात पाणी घेण्याकरिता गेलेला तरुण बाघ नदीत बुडाला; शोध सुरू

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने काल निकाल जाहीर केला. त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ज्ञ, आहारतज्ज्ञ,औषधनिर्माता अशा विविध ५१८२ पदांसाठी ही भरती परीक्षा होती. या परीक्षेत याआधी म्हाडा, पिंपरी चिंचवड पोलीस भरती आणि तलाठी भरती परीक्षेत आरोपी असलेल्या गणेश गुसिंगेला २०० पैकी १३८ गुण मिळाले. त्यामुळे या परीक्षेतसुद्धा या उमेदवाराने गैरप्रकार केला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused who cracked the talathi exam paper passed health department exam dag 87 mrj
Show comments