अमरावती : मद्यधुंद अवस्थेत स्वत:चे घर जाळणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक १) ए. एच. लद्धड यांच्या न्यायालयाने अटक झाल्‍याच्‍या तारखेपासून २८ ऑगस्‍टपर्यंत २ वर्षे, ५ महिने व १५ दिवस अशी शिक्षा सुनावली. ही घटना १३ मार्च २०२१ रोजी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन कॉलनीत घडली होती.

नीलेश दामोदर खोंडे (४३) रा. नंदनवन कॉलनी, अमरावती असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, १२ मार्च २०२१ रोजी आरोपी नीलेश खोंडे हा मद्य प्राशन करून घरी आला. त्याने नेहमीप्रमाणे पत्नी सुप्रिया यांच्याशी वाद घालत, त्यांच्यासह मुलांना शिवीगाळ करीत रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांना घराबाहेर काढून दिले. त्यामुळे सुप्रिया यांनी पती नीलेशविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या वडिलांकडे निघून गेल्या. रात्री २ वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या तातडीने घरी पोहोचल्या. त्यावेळी नीलेश हा घरातच होता. मी माझ्या घराला आग लावली, तुम्हाला काय करायचे आहे, असा तो बडबडला. त्यामुळे सुप्रिया यांनी घटनेची माहिती अग्निशमन दल व पोलिसांना दिली.

Kavita Badla murder case Vasai court sentences four accused to life imprisonment
कविता बाडला हत्या प्रकरण : चार आरोपींना वसई न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Four dead in Gujarat due to kite string injuries
नायलॉन मांजामुळे सात जणांचा मृत्यू; मुंबईत १९ जणांविरोधात कारवाई
Asaram Bapu
Asaram Bapu : आसाराम बापूला २०१३च्या बलात्कार प्रकरणात दिलासा! राजस्थान उच्च न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन
75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
Rhona Wilson
रोना विल्सन, सुधीर ढवळे यांना जामीन; शहरी नक्षलवाद प्रकरण
supreme Court
Supreme Court : वयाच्या १४ वर्षी केलेल्या गुन्ह्यात व्यक्तीची २९ वर्षांनंतर सुटका; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?

हेही वाचा – धक्कादायक! हुडकेश्वरच्या हवालदाराकडे चक्क आरोपीची कार, जप्तीच्या मुद्देमालाचा पोलिसांकडूनच वापर

हेही वाचा – वेकोलिच्या स्फोटाचा धक्का : घर कोसळल्याने बापलेकीचा दबून मृत्यू

पोलिसांनी नीलेशला आगग्रस्त घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी सुप्रिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे यांनी तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रणजित भेटाळू यांनी सहा साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. ए. एच. लद्धड यांच्या न्यायालयाने आरोपी नीलेशला दोषी ठरविले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील अवसरमोल व अरुण हटवार यांनी काम पाहिले.

Story img Loader