अमरावती : भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत अचलपूर मतदारसंघातून प्रवीण तायडे यांचे नाव झळकल्यानंतर भाजपमधील अंतर्गत उद्रेक बाहेर आला असून सात इच्छूक उमेदवारांनी एकत्र येत बंडाचा इशारा दिला आहे. पक्षाने निवडून येण्याची क्षमता नसलेला ‘डमी’ उमेदवार दिल्याचा आरोप या इच्छूक उमेदवारांनी केला. उमेदवार न बदलल्यास तीन जण उमेदवारी अर्ज भरतील आणि त्यापैकी एका उमेदवाराच्या नावावर मतैक्य घडवून आणून निवडणूक लढवू, असा इशारा भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
प्रवीण तायडे यांनी गेल्या एक वर्षापासून अचलपूर मतदारसंघामध्ये गटबाजीचे राजकारण करून पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या इतर इच्छूक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींना याबाबत अवगत केले. प्रवीण तायडे वगळून इतर कुणालाही उमेदवारी दिल्यास सर्व एकदिलाने काम करून भाजपचा उमेदवार निवडून आणू, असे पक्षश्रेष्ठींना सांगितले. तरीही पक्षाने कटकारस्थान करणाऱ्यास संधी दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रवीण तायडे हे निवडून येण्याची शक्यता नसल्याने आम्ही पक्षश्रेष्ठींकडे उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे, ती मान्य न झाल्यास आम्ही बंडखोरी करू, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला.
हेही वाचा : धोकादायक! नागपूर विमानतळाला ६३ उंच इमारतींचा विळखा…
प्रवीण तायडे यांच्या उमेदवारीविषयी मतदारसंघात नाराजीचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांना आम्ही यासंदर्भात कळवले आहे. आमच्यापैकी कुणीही भाजपच्या विरोधात किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या विरोधात वक्तव्य करणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रवीण तायडे यांची उमेदवारी पक्षाने कायम ठेवल्यास प्रमोदसिंह गड्रेल, मनोहर सुने, सुधीर रसे हे तीन जण अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरतील. यापैकी एका जणाची सर्वानुमते उमेदवार म्हणून निवड केली जाईल आणि ते नाव काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा : गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला, चकमकीत पाच नक्षल्यांना कंठस्नान
पक्षांतर्गत निवड समितीने जेव्हा मतदान घेतले, तेव्हा मतदार यादीत बाहेरील व्यक्तींची नावे आम्हाला दिसली. आम्ही पक्ष निरीक्षकांकडे यासंदर्भात निवेदन दिले, पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. प्रभारी म्हणून प्रवीण तायडे यांनी मतदार यादी ठरवली आणि आपल्या बाबतीत अनुकूल बाबी घडवून आणल्या, असा आरोपही यावेळी करण्यात आला. पत्रकार परिषदेला इच्छूक उमेदवार प्रमोदसिंह गड्रेल, सुधीर रसे, मनोहर सुने, गोपाल तिरमारे, अक्षरा लहाने, डॉ. राजेश उभाड, नंदकिशोर वासनकर यांच्यासह अभय माथने, प्रसन्ना काठोळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.