Bachchu Kadu in Achalpur Vidhan Sabha Constituency : अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील शहर आणि तालुका आहे. भौगोलिकदृष्ट्या अचलपूर शहर हे सातपुडाच्या कुशीत वसलेले असून ते महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर स्थित आहे. शहर डोंगराळ भागाने वेढलेले आहे. बच्चू कडू हे अचलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि महायुतीतून भाजपा पक्षाने निवडणुकीसाठी उमेदवार उभा केला आहे.

चारवेळा अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व

बच्चू कडू यांनी चारवेळा अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००४, २००९, २०१४ आणि २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी अचलपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा ते भाग होते. नंतर २०२२ साली महाविकास आघाडीतील शिवसेनेचे दोन गट झाले. बच्चू कडू एकनाथ शिदे गटाबरोबर गेले. नंतर एकनाथ शिंदेंसह त्यांनी महायुतीत प्रवेश केला.

Raj thackeray sixth List
MNS Candidates List : मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई-ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
Teosa Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Teosa Vidhan Sabha Constituency : यशोमती ठाकूर यांच्यासमोर आव्हान कोणाचे ?
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
Ravi Rana in Badnera Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Badnera Vidhan Sabha Constituency : रवी राणा विजयाचा चौकार मारणार? विरोधातील मतविभागणी पथ्यावर पडणार?
India before modernity
ना उजवा, ना डावा; का होतोय भारतीय इतिहासाच्या पुनर्लेखनाचा शास्त्रीय विचार?

हेही वाचा – Prakash Ambedkar : ‘विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा

महायुतीत राहून विरोधी भूमिका

महायुतीत राहून बच्चू कडू यांनी महायुतीविरोधी भूमिका देखील घेतली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यास बच्चू कडू यांनी विरोध केला होता. कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार उभा केला होता. नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार होत्या. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

दिव्यांगासाठी केलेल्या विविध आंदोलनामुळे चर्चेत

दिव्यांगासाठी केलेल्या विविध आंदोलनामुळे बच्चू कडू जास्त चर्चेत राहिलेले आहेत. मात्र अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे. वादग्रस्त आणि महायुतीविरोधी विधानांमुळे ते चर्चेत असतात. महाविकास आघाडीत असताना उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांनी शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग यांसह विविध विभागांचे राज्यमंत्रीपद सांभाळले आहे. मात्र महायुतीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू हे महायुतीकडून लढणार की स्वतंत्र लढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी सलग ४ वेळा अचलपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

हेही वाचा – उमेदवारी देताना ‘लाडकी बहीण’ नावडती

तिसरी आघाडी

बच्चू कडू, संभाजी राजे आणि राजू शेट्टी यांनी मिळून महाशक्ती ही तिसरी आघाडी निर्माण केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण महायुतीविरोधात उमेदवार उभे करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू यांची ही भूमिका महायुतीला आव्हानात्मक ठरणार आहे.

काँग्रेस, भाजपाचे आव्हान

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू आपल्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अचलपूर मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांच्यासमोर भाजप आणि काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला आहे. काँग्रेसकडून अनिरुद्ध देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपाकडून प्रवीण तायडे या मतदारसंघातून उभे आहेत. बच्चू कडू यांना पुन्हा या मतदारसंघातून विजय मिळतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.