वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाने किडनी म्हणजेच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शंभरावी शस्त्रक्रिया पूर्णत्वाला नेऊन आरोग्यसेवेच्या मैदानात आगळेवेगळे शतक झळकविले आहे. रुग्णालयातील शल्यचिकित्सकांच्या चमूने हा आनंद केक कापून उत्साहात साजरा केला. 

सावंगी मेघे रुग्णालयात २००१ साली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा आरंभ झाला. महानगरातील महागड्या कार्पोरेट हॉस्पिटलच्या तुलनेत सावंगीसारख्या खेडेवजा गावात असलेल्या या रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सुरुवातीच्या काळात मोजकीच होती. मात्र, गत २२ वर्षांत अत्याधुनिक व प्रगत वैद्यकीय सेवेवर लक्ष केंद्रित करीत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाने प्रगतीचा एक एक टप्पा यशस्वीरीत्या गाठला. कमीत कमी खर्चात आणि शक्यतो आरोग्यदायी योजनेतून सामान्य रुग्णांना मोफत अद्यावत शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आज सावंगी रुग्णालय मध्यभारतातील महत्त्वाचे आरोग्यकेंद्र झाले आहे. खुल्या सामान्य शस्त्रक्रियेपासून रोबोटिक सर्जरीपर्यंत वाटचाल करणाऱ्या या रुग्णालयाने आता किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे शतक पूर्ण केले आहे. 

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
sanjay bangar son gender transformation
आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?

हेही वाचा – गडचिरोली : मेडीगड्डा धरणावरील पूल खचला, सिरोचा तालुक्याला धोक्याचा इशारा, २० गावांतील शेतकऱ्यांना फटका

या शतकीय शस्त्रक्रियेत आई, वडील, बहीण, भाऊ किंवा अपत्य अशा रक्ताच्या नातेवाईकांनी दिलेल्या किडनीदानातून एकूण ८४ प्रत्यारोपण करण्यात आले आहे. तर, गत सात वर्षांपासून कॅडेव्हरिक म्हणजेच ब्रेन डेड झालेल्या मरणावस्थेतील रुग्णाद्वारे प्राप्त झालेल्या अवयवदानातून १६ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कोरोनाच्या बिकट काळातही सावंगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आले. तर मागील दहा महिन्यांत ऑक्टोबर २०२३ पर्यंत लाईव्ह आणि कॅडेव्हरिक या दोन्ही पद्धतीने १४ किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आल्या आहेत. ब्रेन डेड रुग्णाद्वारे आजतागायत सावंगी रुग्णालयात किडनीसोबतच हृदय, यकृत (लिव्हर), फुफ्फुसे (लंग्स), नेत्रपटल (कॉर्निया) तसेच त्वचादेखील गरजू रुग्णांसाठी दान करण्यात आली आहे. अर्थात माणुसकीच्या भावनेतून रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या संमतीमुळेच या अवयवदानातील शस्त्रक्रिया शक्य झाल्या आणि अनोळखी गरजू रुग्णांना नवजीवन प्राप्त झाले.

रुग्णालयाचे संस्थापक व अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, प्रधान सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, संस्थेचे वरीष्ठ पदाधिकारी, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदान जागृती आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत ही वाटचाल यशस्वीरीत्या सुरू आहे. या अवयव विलगीकरण व प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत झेडटीसीसी म्हणजेच विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ युरोलॉजिस्ट डॉ. संजय कोलते यांच्यासह डॉ. अभिजित ढाले, डॉ. जय धर्माशी, डॉ. शिवचरण बालगे, डॉ. अक्षय कृपलानी, डॉ. ऋतुराज पेडणेकर, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. मनीष बलवानी, डॉ. अमित पसारी, डॉ. कपिल सेजपाल, डॉ. शुभम दुबे, डॉ. प्रांजल काशीब, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, डॉ. संज्योत निनावे, डॉ. नीता वर्मा, डॉ. जुही जाधव, डॉ. शीतल मडावी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे.

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये डॉक्टरांच्या प्रतीक्षेत, बालरोगतज्ञ आणि परिचारिकांसह सुमारे २०० पदे वर्षानुवर्षे रिक्त

या एकूणच या प्रक्रियेत सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, प्रत्यारोपण समन्वयक डॉ. रुपाली नाईक, प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, अर्चना साखरकर, प्रियांका चिमोटे, न्यूरॉलॉजी व न्यूरोसर्जरी विभागाचे डॉ. तुषार पाटील, डॉ. संदीप इरतवार, डॉ. जितेंद्र ताटघरे, डॉ. तपन धुमे, डॉ. प्रिन्स वर्मा, डॉ. अमोल आंधळे, कार्यालयीन व्यवस्थापनातील अहमिंद्र जैन, आदित्य भार्गव, राजेश सव्वालाखे, लाखी बिस्वास, प्रज्वल बोन्डे, पवन चाफले, खुशबू कुंडू, शुभांगी ब्राह्मणे, अतिदक्षता विभागातील मृणाल बांबोडे, संतोष, प्रतिमा सांगोलकर, मनोज महाकाळकर, मुरली सातपुते तसेच परिचारक वृंदाने विविध पातळ्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अवयवांचे स्थानांतरण नियोजित वेळेत व्हावे यासाठी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभाग तसेच झेडटीसीसी सदस्यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे.