अनिल कांबळे

नागपूर : फेसबुक-इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून मैत्री व नंतर तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर काही दिवसांतच प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतात. कुटुंबाचा विरोध झुगारून लग्न करतात. परंतु, वर्षभराच्या आतच दोघांमध्ये कुरबूर होते आणि प्रेमविवाह ताटातूट होण्याच्या मार्गावर येते. गेल्या पाच वर्षांत ३ हजार ४०० अशाच प्रेमीयुगुलांनी भरोसा सेलमध्ये तक्रारी केल्या आहेत.

अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Couples divorce averted after change of mind through coordination in Lok Adalat
पती ६८ तर पत्नी ६६ वर्षांची; कौटुंबिक वादाने गाठले टोक, पण…
Grandfather expressed his love To Grandmother
‘आमचं आय लव्ह यू…’ आजोबांनी हटके स्टाईलमध्ये प्रेम केलं व्यक्त; आजी लाजल्या अन्…, पाहा Viral Video
Divorce
Farmer Divorce : ७० वर्षीय शेतकऱ्याने घेतला घटस्फोट, ४४ वर्षांचा संसार मोडल्यानंतर पोटगीसाठी द्यावे लागले ‘इतके’ कोटी रुपये!

‘फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टिंडर, डेटिंग साईट्स’वरून अनेक तरुण-तरुणी एकमेकांशी मैत्री करतात. तसेच काही शिक्षण घेताना किंवा परिसरातील तरुण-तरुणींशी मैत्री करतात. मैत्रीतून लगेच काही दिवसांतच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात. एकमेकांवर पैसे खर्च करणे, सिनेमा, हॉटेल, महागडी खरेदी सुरू होते. एकमेकांना वेळ देण्यात येतो. काही तरुण-तरुणी लग्नाबाबत कुटुंबीयांशी चर्चा करतात तर काही थेट न्यायालयातून नोंदणी विवाह किंवा पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात.

हेही वाचा >>> नागपूर : भाजप समर्थित उमेदवार नागो गाणारांची थेट देवेंद्र फडणवीसांविरोधात भूमिका

 कुटुंबीयांच्या विरोधाला झुगारून दोघेही प्रेमविवाह करतात. प्रेमविवाहानंतर केवळ सहा महिने ते वर्षभरात दोघांतील संबंधात दुरावा निर्माण होते. दोघांचेही प्रेम कमी होते आणि थेट एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. उपराजधानीत गेल्या पाच वर्षात जवळपास प्रेमविवाह करणाऱ्या ३ हजार ४०० तरुणींनी भरोसा सेलमध्ये तक्रार केली आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : “बदला घ्यायचा आहे…”, माजी मंत्री हंसराज अहीर यांच्या चित्रफितीने राजकारण तापले

आता मला बंधन नकोय

प्रियकर-प्रेयसीचे नाते चांगले होते. लग्न झाल्यानंतर मोठ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. सासू-सासरे आणि पतीने नातेवाईकांचेही नखरे सहन करावे लागतात. प्रियकराचा पती झाल्यानंतर तो पूर्वीसारखा वेळ देत नाही, पहिल्यासारखे प्रेम उरले नाही. त्याला आता माझी गरज नाही. त्याच्या मनात कुणीतरी दुसरी असावी, म्हणून तो माझ्याकडे दुर्लक्ष करतो. आता मला बंधन नकोय, अशा तक्रारी करीत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : अर्ज भरताना गाणारांसोबत भाजपचा एकही बडा नेता नाही

वाढत्या अपेक्षांमुळे वाद

लग्न झाल्यानंतर तरुण-तरुणींच्या वागण्यात बदल होतो. सहाजिकच तरुणावर कुटुंबासह पत्नीची जबाबदारी असते. त्यामुळे दोन पैसे कमावण्यावर तो भर देतो. तर याउलट प्रेयसीची पत्नी झाल्यानंतर पतीकडून जास्त अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांच्या नव्या संसारात खटके उडण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, भरोसा सेलमध्ये तक्रार आल्यानंतर दोघांनाही बोलावून संसार आणि वैवाहिक आयुष्याबाबत समुपदेशन केले जाते. अनेकांचे संसार नव्याने थाटण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

– सीमा सूर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरोसा सेल.

प्रेमविवाहानंतरच्या तक्रारींची आकडेवारी

वर्ष – तक्रारी

२०१७ – ५२४

२०१८ – ५५३

२०१९ – ३८६

२०२० – ४५८

२०२१ – ६४१ २०२२ – ७८०

Story img Loader