लोकसत्ता टीम
नागपूर : उपराजधानीतील गणेशपेठ परिसरात नियमबाह्यरित्या खासगी ट्रॅव्हल्स कुठेही उभ्या करून प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे गुरुवारी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या येथील ११ ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांचे धाबे दणाणले आहे.
गणेशपेठ बसस्थानक परिसरात रस्त्यावर पार्क केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे नेहमीच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या बसेसमुळे येथे बरेच अपघातही होतात. याचा फटका केंद्रीय मंत्र्यांना देखील बसला आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारींमुळे माजी महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत कारवाईची सूचना केली होती.
आणखी वाचा-नागपूरच्या कोणत्या ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाचा नमविस्तार?
ही कारवाई गणेशपेठचे पोलीस निरीक्षक एच. आर. घाडगे, आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षक मंजूषा भोसले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीणा झोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
बसचालकांनी गाठले अन्य स्थळ
गुरुवारी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या सकाळपासून ११ बसेसवर कारवाई केली. ही कारवाई पुढेही चालणार असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कारवाई सुरू झाल्यावर येथील बऱ्याच बसेस चालकांनी येथून पलायन करून इतर स्थळ गाठल्याची सूत्रांची माहिती आहे.