नागपूर : स्वातंत्र्यदिनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सुसाट वाहने चालवणाऱ्या ३ हजारांपेक्षा जास्त वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच ५०० वर बुलेटसह अन्य वाहने जप्त केली.
स्वातंत्र्य दिनी अनेकजण दुचाकीवर तिरंगा लावून बाहेर पडतात. हेल्मेट घालत नाहीत. एका दुचाकीवरून तिघे (ट्रिपल सीट) प्रवास करतात. फुटाळा, अंबाझरी, व्हीआयपी रोड किंवा मोकळ्या रस्त्यावर ‘स्टंटबाजी’ करतात. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते.
हेही वाचा – स्वातंत्र्य दिनी मेट्रोतून तब्बल १.३१ लाख नागपूरकरांचा प्रवास
हेही वाचा – वनरक्षकांना मृतदेह कुजल्याचा वास आला, झाडांच्या फांद्या हटवताच जे दिसले..
पोलिसांनी मंगळवारी दिवसभर विशेष मोहीम राबवली. यात पोलिसांनी ३ हजार २१६ दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली. यामध्ये जवळपास ३०० बुलेट वाहनांचा समावेश आहे. काही दुचाकीचालक सुसाट वाहन चालवत जोरात ‘हॉर्न’ वाजवत होते. बुलेटचे फटाके फोडणारे सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्न पोलिसांनी काढून टाकत दंडात्मक कारवाई केली.