लोकसत्ता टीम

नागपूर: उपराजधानीतील विविध भागात रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या प्रवासी वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि शहर वाहतूक पोलिसांनी एकत्र कारवाई सुरू केली आहे. १ हजार २०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune ranks fourth in the world in slow traffic Pune print news
मंद वाहतुकीत पुणे जगात चौथे
new york city charges congestion fee peak-hour traffic
न्यूयॉर्कमध्ये वाहनचालकांना द्यावे लागणार ‘वाहतूक कोंडी शुल्क’! काय आहे ‘कंजेशन प्रायसिंग’? मुंबईतही अमलात येऊ शकते?
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
Kalyan-Dombivli, Kalyan-Dombivli drivers ,
कल्याण-डोंबिवलीत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कारवाई
Focus on making 15 major roads in the city congested pune news
गतिमान वाहतुकीचा संकल्प; शहरातील प्रमुख १५ रस्ते कोंडीमुक्त करण्यावर भर
passenger and memu special trains running from cr bhusawal division of operated with regular numbers
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे…‘या’ गाड्यांमध्ये आजपासून झाले बदल

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वाहनांवर कारवाईबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक पोलिसांना सूचना केली. त्यावरून वाहतूक पोलिसांसह शहर आरटीओ आणि पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी वेगवेगळे पथक बसवून एकाच वेळी अमरावती मार्ग, वाडी, पारडी, बर्डी, विमानतळ या मार्गांवर कारवाई केली. शहर आरटीओकडून एकूण ३२ वाहनांवर कारवाई करून त्यातील ५ वाहने ताब्यात घेण्यात आली.

आणखी वाचा- अकरा एसटी चालक-वाहकांचे निलंबन तीनच दिवसात रद्द; महामंडळाला उपरती की आंदोलनाचा धसका?

पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयाने ३५ वाहनांवर कारवाई करून १४ वाहने ताब्यात घेतली. शहर वाहतूक पोलिसांनी २४ मार्चला ७१४ वाहनांवर कारवाई करून त्यातील १४४ ताब्यात घेतली. २५ मार्चला ४२५ वाहनांवर कारवाई करून १६८ वाहने ताब्यात घेतली. वाहतूक पोलिसांनी २४ मार्चला कारवाई केलेल्या वाहन धारकांकडून १ लाख ४० हजार २०० रुपये तर २५ मार्चला वाहन धारकांकडून ३ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाईचे नेतृत्व वाहतूक पोलीस उपआयुक्त चेतना तिडके तर आरटीओच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी रवीद्र भुयार यांनी केले.

वाहतूक पोलिसांवी कारवाई

संवर्ग कारवाई ताब्यात

ऑटोरिक्षा ६६३ २०२

ई- रिक्षा १०३ ०६७

जड वाहने ३७३ ०४३

एकूण १,१३९ ३१२

Story img Loader