नागपूर : येथील वेगवेगळ्या भागात संपर्क कार्यालय अथवा ‘पिक अप पाॅईंट’च्या नावाने व्यवसाय करणाऱ्या चार खासगी वाहन प्रशिक्षण केंद्रांवर (ड्रायव्हिंग स्कूल) नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मंगळवारी कारवाई केली.

मोटार वाहन कायद्यानुसार ‘ड्रायव्हिंग स्कूल’ चालकांना आरटीओकडून मंजूर केलेल्या पत्त्यावरच व्यवसाय करता येतो. परंतु, शहरातील काही ड्रायव्हिंग स्कूल संपर्क कार्यालय आणि ‘पिक अप पाॅईंट’च्या नावावर इतरही ठिकाणी व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी आरटीओ कार्यालयाला आल्या होत्या. त्यावरून मंगळवारी आरटीओच्या पथकांकडून डिफेंस, वाडी, हिंगणा रोडसह इतरही भागात तपासणी मोहीम राबवली गेली.

Pune Municipal Corporation takes action after stray dog ​​attack
भटक्या श्वानांच्या हल्ल्यानंतर महापालिकेने उचलले हे पाऊल!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Central Railways 76.43 km automatic signalling from varangaon to akola
अकोला : मध्य रेल्वेचे ७६.४३ कि.मी.चे स्वयंचलित ‘सिग्नलिंग’, फायदे काय जाणून घ्या…
school transport Pune, school Pune, vehicles pune,
पुण्यातील शालेय वाहतुकीच्या प्रश्नावरून नागपुरात आवाज! आता तरी वाहनांची तपासणी होणार ?
Kharadi IT Park, Metro pune,
पुणे : ‘आयटी’तील कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर.. काय आहे मेट्रोचा प्रयत्न ?
Technical work Sindhi railway station, trains cancelled,
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ ९ रेल्वे रद्द…
thane municipal corporation
विश्लेषण : नरिमन पॉइंट, बीकेसी, सीप्झसारखे ग्रोथ सेंटर आता ठाण्यामध्येही… कसा आहे कळवा प्रकल्प?
Cabinet swearing in ceremony in Nagpur
नागपूरमध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीची ही कितवी वेळ?

हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी आता रुग्णाचे ‘जीओ टॅग’ छायाचित्र बंधनकारक, योजनेत ‘हे’ झाले बदल

हेही वाचा – आमदार रोहित पवार… रोहित पाटील.. आणि नागपूरचे झणझणीत तर्री चणा पोहे; काय आहे वाचा…

दीक्षांत ड्रायव्हिंग स्कूल, एम. वझलवार ड्रायव्हिंग स्कूल, आदर्श ड्रायव्हिंग स्कूल, देसाई ड्रायव्हिंग स्कूल हे नियम मोडताना आढळले. त्यामुळे या सगळ्याच ड्रायव्हिंग स्कूलच्या विरोधात आरटीओकडून तेथील स्थानिक पोलिसांकडे संबंधित ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई करण्याची तक्रार दिली गेली. ही कारवाई आनंद मोड, यश वाघमारे, कुणाल कुथे, व्यंकेटश सिंदम यांनी केली.

Story img Loader