यवतमाळ : सण उत्सवात रस्ता सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्त्यावर उतरले. वणी – शिरपूर – शिंदोला रोडवर आरटीओच्या पथकाने धडक कारवाई करून वाहनधारकांना रस्ता सुरक्षेचे महत्व सांगून दंडही वसूल केला. वणी-शिरपूर-शिंदोला रोडवर अवैधरित्या चालणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर, विना हेल्मेट वाहन चालकावर तसेच फिटनेस, इन्शुरन्स, पीयूसी व इतर कागदपत्रे संपलेल्या दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली.
सोबत ५० वाहन चालकांचे ब्रेथ एनालायझर (अल्कोहोल टेस्ट) करण्यात आले. या कारवाईत सुमारे २६ दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करून सुमारे दोन लाख ८५ हजार दंड आकारण्यात आला. रस्त्यावरील वाढते अपघात कमी करणेबाबत आणि रस्ता सुरक्षा बाबत ही कारवाई वायुवेग पथकातील अधिकारी मोटार वाहन निरीक्षक गणेश पवार, राहुल चौधरी, परेश गावसाने, अक्षय सोळंकी, सतीश टुले, नितीश पाटोकर आणि वाहन चालक वांढरे, तायडे यांनी यशस्वी केली