लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : ओंकारनगर परिसरात ऑटोरिक्षा चालकाने एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचे पुढे आल्यावर अजनी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
पोलिसांच्या शिफारशीवरून पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या ऑटोरिक्षा चालकाचा परवाना निलंबन आणि ऑटोरिक्षाची नोंदणी रद्दबाबत नोटीस बजावत कडक कारवाईचे संकेत दिले आहे.
आणखी वाचा-नागपूर : शौचालयातील पाण्याचा वापर करून चहाची विक्री
पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सोमवारी आरोपी ऑटोरिक्षा चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली. नोटीसमध्ये अजनी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हाचा संदर्भ देत ऑटोरिक्षा चालकाने या कृत्यातून कोणत्या मोटार वाहन नियमांचा भंग केला त्याबाबत सांगण्यात आले. या सगळ्या प्रकारावर सात दिवसांच्या आत आरोपीने आरटीओला प्रत्यक्ष हजर राहून अथवा लेखी उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले. घटनेनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार आणि अजनी पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांच्यात या गंभीर प्रकरणावर चर्चाही झाली.
दोन्ही विभागांच्या समन्वयातून शेवटी अजनी पोलिसांनी पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सदर ऑटोरिक्षा चालकाचा परवाना निलंबित व वाहनाची नोंदणी रद्द करण्यासाठी शिफारीश करणारे पत्र पाठवले. या पत्राची दखल घेत आरटीओ कार्यालयाकडून आरोपी ऑटोरिक्षा चालकाला परवना निलंबन व वाहनाचे नोंदणी रद्दबाबत नोटीस बजावण्यात आली.
आणखी वाचा-नागपूर : ‘त्या’ वाघाच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण?
प्रकरण काय?
अजनीतील ग्रीन प्लॅनेट कॉलनी, ओंकारनगरातील रस्त्याच्या कडेला ८ मे रोजी दुपारी आरोपी ऑटोचालक विशाल देशमुख नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करीत होता. ती मुलगी वारंवार विनवण्या करूनही ऑटोचालक बळजबरी करीत होता. हा सर्व प्रकार एका महिलेने घराच्या खिडकीतून मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. अजनी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ऑटोचालक विशाल देशमुखला ताब्यात घेतले. बदनामीच्या भीतीपोटी मुलीच्या पालकांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल करून ऑटोचालकाला अटक केली.