नागपूर : जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यावरही ७६२ स्कूलबस, स्कूलव्हॅनची योग्यता तपासणी झाली नसल्याचे जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पुढे आले होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारपासून या नियमबाह्य वाहनांवर कारवाई सुरू झाली. पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत १८ वाहने जप्त केली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – भंडारा : जीर्ण शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; सुदैवाने मुले बचावली

प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दोन पथके सोमवारी सकाळपासून नियमबाह्य शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांत लावली होती. या पथकांनी दुपारी ३ वाजतापर्यंत स्कूलबस, स्कूलव्हॅन, ऑटोरिक्षा, खासगी वाहने असे एकूण १८ वाहने जप्त केली. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी काहींची योग्यता तपासणी नसणे, काहींनी आंतर्गत बदल करून मागच्या डिक्कीतही मुले बसवणे, ऑटोरिक्षामध्ये मागच्या डिक्कीत मुले बसवणे, अग्निशमनची पर्याप्त सोय नसणेसह इतरही नियम मोडले होते. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले.