यवतमाळ : दीड वर्षापासून प्रशासनाची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत गेल्या दीड वर्षांपासून पदाधिकारी, सदस्य नसल्याने विभागप्रमुख आपल्या मनमर्जीने वागत आहेत. त्यामुळे कर्मचारीही बेशिस्त झाले आहेत. विकासकामांचा खोळंबा होत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दखल घेत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देत सर्वांनाच ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तूर्तास निवडणूक होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहे. विभागप्रमुख कधीही येतात आणि दौऱ्याचे निमित्त करून निघून जातात. कर्मचाऱ्यांकडूनही तोच कित्ता गिरविला जात होता. एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत वाढल्याची बाब नव्याने रूजू झालेले मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या लक्षात आली. कार्यालयीन शिस्तीसाठी परिपत्रक काढून कान टोचले. फाईलचा प्रवास नियमाप्रमाणेच व्हावा, यावर विशेष भर आहे. नियमावर बोट ठेवूनच कामकाज व फाईलवर स्वाक्षरी केली जात असल्याने विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांची दाणादाण उडत आहे. कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेतील बेशिस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; नियमावर बोट ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली दखल
दीड वर्षापासून प्रशासनाची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-09-2023 at 15:08 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action plan against unruly officers employees of yavatmal zilla parishad nrp 78 amy