नागपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) विद्यमान अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यावर बुधवारी एका जुन्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे नागपुरातील वैद्यकीय क्षेत्रात शहरातील विविध वैद्यकीय संस्थेतील अनेक अधिष्ठात्यांवर यापूर्वी कारवाई झाल्याची चर्चा रंगली आहे.

मेडिकलमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप होता. त्यावेळी अजनी पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्देशानंतर अजनी पोलिसांनी बुधवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यासह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला. जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक केवलराम पांडुरंग पटोले (६५) हे तक्रारदार आहेत. त्यांची पत्नी पुष्पा यांच्या मानेवरील गाठीसंदर्भात डॉ. गजभिये यांना दाखवले. ६ जुलै रोजी पुष्पा यांच्यावर मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर अचानक पत्नीची प्रकृती खालावली. शस्त्रक्रिया गृहातून पत्नीला बाहेर आणल्यावर डोळ्यावर कापूस ठेवला होता व नाकाला रबरी नळी जोडली होती. त्यांना अतिदक्षता विभागात नेले. येथे नातेवाईकांना भेटूदेखील दिले नाही. डॉ. गजभिये यांनी दुसऱ्या दवाखान्यात नेऊ देण्यासदेखील नकार दिला. परिचित डॉक्टरांकडून रुग्णालयातून सुट्टीसाठी संपर्क केल्यावर रात्री मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदनही केले नाही. याप्रसंगी हृदयविकाराने मृत्यूचा आव आणला गेला. परंतु, वैद्यकीय संचालकांकडून पाच डॉक्टरांच्या नियुक्त समितीने कागदपत्रांची तपासणी करून रुग्णाची काळजी घेण्यात निष्काळजीपणा झाल्याचे अहवालत नमूद केले. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर गुरुवारी वैद्यकीय क्षेत्रात या गुन्हाबाबतच चर्चा होती.

Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
गँगस्टर डीके रावसह सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा, गुन्हे शाखेची कारवाई
police injured , mumbai , rickshaw ,
मुंबई : पोलिसाला रिक्षासोबत फरफटत नेले, रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच

हेही वाचा – नागपूर शहरबसची चर्चा सेवेपेक्षा गैरव्यवस्थापनांसाठीच अधिक

हेही वाचा – चंद्रपूर : एमआयडीसीतील बंद कारखाने बनले असामाजिक तत्त्वांचा अड्डा

चर्चेत यापूर्वी मेयोच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी वाहणे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचल्यावर त्यांचे निलंबन, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्केवार यांचे एका प्रकरणात निलंबन, मेडिकलचे डॉ. जगताप यांचे यापूर्वी निलंबन झाल्याचे विषय पुढे आणले जात होते. तर मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. एन. के. देशमुख, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. दीप्ती डोनगावकर, डॉ. नगराळे यांच्यावरही यापूर्वी कारवाई झाल्याची चर्चा डॉक्टरांमध्ये होती. त्यापैकी काही प्रकरणात कालांतराने काही अधिकारी निर्दोष सुटले होते, हे विशेष.

Story img Loader