वर्धा : पोलीस वाहतूक शाखेतर्फे सध्या विशेष मोहीम सुरू आहे. त्यात भल्या भल्याच्या गाड्या पकडल्या जात आहेत. पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस अंमलदारासपण कारवाईचा फटका बसला. त्यांच्या बुलेटला मोठा आवाज करणारे पंजाबी सायलेंसर लावल्याचे दिसून आले होते. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – बुलढाणा: भावाच्या मदतीने केली पतीची हत्या; आता दोघेही भोगणार शिक्षा
हेही वाचा – तलाठी भरतीत ‘सेटींग’ होईल का? उमेदवारांकडून विचारणा; १९ लाखांचा दर अन्…
गत जून या एकच महिन्यात रस्ते अपघातात १०७ नागरिकांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी वाहतूक शाखा व शहर पोलीस यांची चमू गठित करीत कारवाईचा धडाका लावला आहे. विना हेल्मेट, सीटबेल्ट नसणे, पंजाबी सायलेंसर, रस्त्याच्या मधोमध गाड्या लावणे, नो पार्किंग परिसरात गाडी उभी ठेवणे अशा प्रकरणात दंड ठोठावून कारवाई होत आहे. मोठा आवाज करणाऱ्या वाहनांवरपण लक्ष दिल्या जात आहे. रस्ते अपघातात घट करण्यासाठी ही मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.