वर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात दारू उपलब्ध होते. कारण लगतच्या चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर व अमरावती जिल्ह्यात दारू कायदेशीरपणे विकल्या जात असल्याने त्या जिल्ह्यातून वर्ध्यात दारू पुरवठा होतो. हे खुले गुपित पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आले आहे. म्हणून वर्ध्यात दारू विकणाऱ्या लगतच्या जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांवर आता कारवाईचा बडगा उगारने सुरू झाले आहे.
हेही वाचा – १२५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, वाशीमच्या आमखेडा गावातील सुंदरबाईंचे निधन
यवतमाळ जिल्ह्यातून वर्धा शहरात दरूसाठा येत असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि पोलिसांचे कान टवकारले. बुरड परिसरात नाकेबंदी करीत कार अडविण्यात आली. त्यात दहा लाख रुपयांवर किमतीचा दारुसाठा सापडला. आरोपी शाहरुख बेग, पीयूष परतेकी यांना अटक करण्यात आली. त्यांनी हा साठा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील मुकेश जयस्वाल याच्याकडून आणल्याची कबुली दिली. फोनवरून ही ऑर्डर दिल्यावर मुकेशने कळंब बायपासच्या मोकळ्या जागेत माल आणून दिला. बार परवान्याचे उल्लंघन केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला. तो तसेच त्याचा नोकर किसना लखिया या दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी नागपूरच्या बार मालकावर कारवाई झाली होती.