बुलढाणा : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना गणेश विसर्जन दिनी विकत घेण्याचा प्रयत्न फसला, म्हणून त्यांच्याविरुद्ध ‘ईडी’ची कारवाई करण्यात आल्याचा गौप्यस्फोट वजा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. सिंदखेड राजा येथे १२ जानेवारीला पार पडलेल्या जिजाऊ जयंती महोत्सव निमित्त संध्याकाळी जिजाऊ सृष्टीवर आयोजित मुख्य सोहळ्याला मिटकरी यांनी हजेरी लावली.
हेही वाचा >>> “हसनमियाँना आत्ताच धर्म कसा आठवला?” किरीट सोमय्यांचा खोचक प्रश्न
यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित करून विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपचे किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करण्याची सुपारी देण्यात आली आहे. मुळात ‘ईडी’च्या कारवाईंची माहिती त्यांना अगोदर कळायला ते काय ब्रम्हज्ञानी आहे का? असा परखड सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >>> ठाकरे गटाला धक्का, कल्याण मध्ये ठाकरे समर्थक शिंदे गटात सामील
सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठासमोरील सुनावणीत सेनेचे बंडखोर आमदार अपात्र ठरतील व लगेच राज्य सरकार कोसळेल असे भाकीत त्यांनी यावेळी केले. यामुळेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे,असे ते म्हणाले. आमदार कडू यांनी यामुळेच विस्तार करता येत नसेल तर नका करू पण किमान खोटं बोलू नका, असे मुख्यमंत्र्यांना सुनावले. त्यामुळे कडू यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी आपण केली आहे. हा अपघात की शासकीय घातपात याची चौकशी होण्याची गरज असल्याचे मिटकरी म्हणाले.