नागपूर : तुम्ही जर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चुकीच्या दिशेने चालवत असाल तर आजच सावध व्हा. कारण आता वाहतूक पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांना थेट पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हे दाखल करीत आहेत. आतापर्यंत १२१ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले असून वाढते अपघात बघता यामध्ये कुणालाही सुट देण्यात येणार नाही.

रस्ते अपघात, दुर्घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस नेहमीच प्रयत्नशील असतात. यासाठी वेळोवेळी वाहनचालकांमध्ये जनजागृतीही केली जाते. मात्र अनेकदा वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडताना दिसतात. यामुळे रस्ते दुर्घटनेच्या घटना घडतात. यामुळे वाहतूक पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत. आता रस्त्याने राँग साईडने गाडी चालवल्यास कठोर कारवाई होणार आहे. राँग साईडने गाडी चालवल्यास गुन्हा करुन थेट लायसन्स रद्द करण्यात येणार येत आहेत.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच

हेही वाचा – ”संजय राऊत खोटे बोलताहेत”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्‍हणाले, ”आधी भांडणे मिटवावीत…”

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत तब्बल ६७ जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला. मृत्यू पावणाऱ्यांमध्ये रॉंग साईडने वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण अर्धेअधिक होते. अपघातात मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत घट व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून आता रॉंग साईड वाहन चालविणाऱ्यांवर थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहे. नवीन वर्षातील गेल्या ६० दिवसांत ६७ अपघाती मृत्यू म्हणजे दररोज एका जणाचा जीव रस्ते अपघातात गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्य दाखवून रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी वाहतूक पोलिसांना आदेश देऊन नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे. ४ मार्चपासून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा वाहतूक पोलिसांनी लावला.

हेही वाचा – “चिंता करू नका, तुमचंच नाव फायनल होणार,” आघाडी, युतीच्या उमेदवारांना पक्षनेतृत्वाचे आश्वासन; संभ्रम वाढला !

परिणामत: आठवड्याभरात केवळ दोन प्राणांतिक अपघात झाले आहे. पोलिसांच्या आक्रमक भूमिकेचा वाहनचालाकांवर परिणाम दिसत असल्याने हे अभियान कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. शहरात हत्याकांडापेक्षाही रस्ते अपघात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या चौपट आहे. तरीही वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. तसेच सिग्नलवरही वाहने थांबवत नाहीत. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलीस आयुक्तांनी नागपुरात वाहन चालक वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवत असल्यामुळे शहरात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. बहुसंख्य वाहन चालक ‘वन वे’ वर विरुद्ध दिशेने वाहन चालवून नियम पायदळी तुडवताना दिसतात. बेशिस्त वाहन चालकांच्या यादीत नागपूरकर आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याच निर्णय घेतला आहे.

Story img Loader