बुलढाणा : आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादांच्या सोबत जाण्याच्या निर्णयाचे सिंदखेड राजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्थन केले आहे. तसेच आम्ही आमदार शिंगणेसोबतच असल्याचे जाहीर केले आहे.
सिंदखेडराजा येथील विश्रामगृहात तालुकाध्यक्ष सतीश काळे यांच्या पुढाकाराने बैठक पार पडली. यावेळी आमदार शिंगणे यांच्या समवेतच राहण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आमदार डॉ. शिंगणे जो निर्णय घेतील त्यासोबत तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष असणार असल्याचा ठराव घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा – समृद्धीवर ‘स्मार्ट-सिटी’ निर्मितीच्या हालचाली! प्रशासकाची नियुक्ती
शहराध्यक्ष सीताराम चौधरी, नगरसेवक, तालुका व शहरातील पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी दिनकर देशमुख, रामभाऊ जाधव यांनी बैठकीत ठराव मांडला. दरम्यान जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनीही आपण माजी मंत्री शिंगणे यांच्या समवेत असल्याचे लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले. सन १९९५ पासून आमदारासोबत जुळलेले संबंध, ऋणानुबंध व बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.