लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुलढाणा: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना काल गुरुवारी पोलिसांनी अटक केल्यावर रात्रीतून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आज सकाळी मलकापूर स्थानकात रेल्वे रोको करण्यापूर्वीच ऍड शर्वरी तुपकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दुसरीकडे काल रात्री अटकेतील रविकांत तुपकरांना मेहकरात व नंतर पुन्हा बुलढाण्यात हलविण्यात आले. यामुळे पोलीस विभागाची चांगलीच दमछाक उडाली. रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात असल्याने आज, शुक्रवारी सकाळी त्यांच्या अर्धांगिनी शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्थानकात दाखल झाले. मात्र पोलिसांचा स्थानकाला गराडा असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणला . राज्य सरकार असंवेदनशील असून त्यांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. पोलिसांची कारवाई हा आंदोलन दडपण्याचा प्रकार असल्याचे शर्वरी तुपकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा-गडचिरोली : दोन महिलांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद

दुसरीकडे आंदोलनासाठी मलकापूर कडे जाणाऱ्या तुपकरांना काल रात्री बुलढाणा पोलिसांनी राजूर घाटातून ताब्यात घेतले. त्यांना अगोदर बुलढाणा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर रीतसर अटक केल्यावर कायदा सुव्यवस्था लक्षात घेता त्यांना मेहकरात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. चिखली येथे कार्यकर्त्यांनी पोलीस वाहन अडविण्याचा असफल प्रयत्न केला. मेहकर पोलीस ठाण्यात तुपकरांना घेऊन येणारे वाहन येण्यापूर्वीच तिथे कार्यकर्त्यांचा जमाव जमा झाला. ‘सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है, या सरकारचे करायचे काय’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान मध्यरात्रीनंतर रविकांत तुपकरांना पुन्हा बुलढाण्यात आणण्यात आले.