नागपूर : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या प्लएटआईम क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे विविध चित्रपट, वेब सिरीज, मालिकांची निर्मिती केली जाते. हे करीत असताना संस्थेमार्फत सामाजिक दायित्व जपण्याचा सतत प्रयत्न केला जातो. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून संस्थेतर्फे निर्मित चित्रपट, मालिका किंवा मालिकेचे चित्रीकरण ज्या शहरात असते तिथे २०० झाडे लावली जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नागपूर : प्रेमी युगुलामुळे दोन संसार उद्ध्वस्त, दोघांनीही विमानाने काढला विदेशात पळ

हेही वाचा – सलग २०० दिवस कार्यरत राहून वीज निर्मिती, १४ वर्षानंतर चंद्रपूर वीज केंद्रात विक्रम

सध्या संस्थेच्या नवीन वेब सिरीजचे चित्रीकरण नागपुरात सुरू आहे. त्यानिमित्ताने सोमवारी २७ नोव्हेंबरला पाचगाव, येथे २०० विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पार पडले. यावळी शाळेतील विद्यार्थींना दिवाळी निमित्त भेट वस्तू देण्यात आल्या. यावळी हेमल ठक्कर, देवेन भोजानी, अभिनेता श्री. राम इंगोले उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor paresh rawal organization innovative initiative in nagpur what happened cwb 76 ssb