लोकसत्ता टीम

नागपूर: नाट्य परिषदेमध्ये गेल्या पाच वर्षात काय झाले यावर आता चर्चा नको. सरकारवर अवलंबून न राहता परिषदेच्या माध्यमातून प्रत्येकाने आपला अहंपणा दूर ठेवत परिषद कशी मोठी होईल, त्या दृष्टीने काम केले पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते आणि परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य प्रशांत दामले यांनी दिला.

कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेच्याच्यावतीने प्रशांत दामले यांचा गिरीश गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दामले म्हणाले, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेत आधी काय झाले यावर चर्चा करायची नाही आणि त्यात वेळ घालवायचा नाही. सर्व पदाधिकारी एकाच दिशेने चालत असतील तर काम करणे शक्य होणार आहे. निवडणुकीत उतरल्यावर परिषदेचे काम काय हे मी सर्वप्रथम जाणून घेतले. राज्यातील नाट्यगृह, नाट्य आणि रसिक हे तीन केंद्रबिंदू ठेवून परिषदेला काम करावे लागणार आहे. नाट्य रसिकांची आणि आपली बांधिलकी कशी वाढेल या दृष्टीने काम करावे लागणार आहे. नाट्य गृहाचे वाढते भाडे कमी करावे लागणार आहे.

हेही वाचा… नागपूर: …म्हणून शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर, राजकीय घडामोडींना वेग

परिषदेची आर्थिक स्थिती सुधारावी लागणार आहे, असे स्पष्ट करत दामले म्हणाले, की आपण सरकारवर अवलंबून राहता कामा नये. नाट्य कलावंतासाठी परिषद आर्थिक दृष्ट्या काय करेल यापद्धतीने येणाऱ्या दिवसात काम करावे लागणार आहे. नाट्यगृहामध्ये सोलर उर्जा लावली तर भाडे कमी होतील. शिवाय नााट्य रसिकांना चांगल्या सुविधा कशा देता येतील त्या दृष्टीने परिषद काम करणार आहे.

हेही वाचा…चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह पाऊस; अनेक भागात झाडे कोसळली, वीज व पाणी पुरवठा खंडित

मुंबईच्या बाहेरुन अनेक कलावंत काम करण्यासाठी येतात, त्यांना मुंबईतील बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळा कशा उपलब्ध करुन देता येईल, हे काम परिषदेला करायची आहे. परिषदेशी संबंधीत असलेल्या संस्थांना आर्थिक सक्षम करण्याचे काम करावे लागणार आहे. सरकारच्या भरोश्यावर न राहता नाट्य परिषदेसह सर्वच नाट्य संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम कशा करायच्या या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे दामले म्हणाले.