नागपूर : वन्यजीवांचा ओढा सर्वांनाच असतो, पण हा ओढा संवर्धनासाठी कमी आणि छायाचित्रणातून मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी अधिक असतो. छायाचित्रण करताकरता संवर्धनाची वाट पकडणारे मोजकेच असतात. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध, पण कायम जमिनीवर पाय रोवून उभे असणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे सयाजी शिंदे. ‘देवराई’च्या बचावासाठी ते देवदूत बनून समोर आले आणि आता वन्यजीवांची त्यांना ओढ लागली. भारतातील पहिल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राला त्यांनी दुसऱ्यांदा भेट दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांपेक्षा मी रवी राणांना घाबरतो”… बच्‍चू कडूंनी उडवली खिल्‍ली

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पासह उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची भ्रमंती नुकतीच सयाजी शिंदे यांनी केली. काही महिन्यांपूर्वीच ते वनखात्याच्या अखत्यारितील सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात येऊन गेले होते. त्यामुळे पेंच आणि उमरेड-कऱ्हांडलाची भ्रमंती करताना त्यांना या केंद्राची आठवण झाली आणि भारतातील अशाप्रकारच्या या पहिल्या केंद्राच्या भेटीचा मोह त्यांना आवरला नाही. वन्यजीवांवर उपचारच नाही तर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात अग्रेसर असणाऱ्या या केंद्राचे त्यांनी कौतुक केले. वनाधिकारीच नाही तर केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपासून तर रात्रंदिवस वन्यप्राण्यांच्या सेवेत असणाऱ्या सर्वांकडून त्यांनी उपचाराविषयी जाणून घेतले. वन्यजीवांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे ईश्वरीय कार्य ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्र करत आहे आणि म्हणूनच या केंद्राला पुन्हा भेट देण्यावाचून राहावले नाही. या केंद्राविषयी लोकांमध्ये जनजागृतीचे कार्य माझ्या हातून घडावे आणि त्यासाठी मी पूर्ण वेळ देईल, असे सयाजी शिंदे आवर्जून म्हणाले. देवराई वाचविण्यासाठी सयाची शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. केवळ पोकळ वल्गना न करता प्रत्यक्षात देवराईच्या संवर्धनासाठी ते काम करत आहेत. एवढेच नाही तर वृक्षलागवडीसाठी ते सातत्याने झटत असतात. अलीकडच्याच वर्षात त्यांना जंगलाजवळून जाताना वणवा पेटलेला दिसला आणि गाडी थांबवत ते सहकाऱ्यासह वणवा नियंत्रणासाठी उतरले. हिरवे फुफ्फुस वाचवणे व त्यात वाढ करणे यात कार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणतात. त्यांच्या या भेटीवेळी उपवनसंरक्षक डॉ भारत सिंह हाडा, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते, माजी सदस्य, सहाय्यक वनसंरक्षक विजय गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे तसेच केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांशी त्यांनी संवाद साधला. तसेच वन्यजीव बचाव व उपचार कार्यात काम करणाऱ्या सर्व योध्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी रजा घेतली.