बुलढाणा: महिलांसाठीच्या ‘पिंक बूथ’सह आदर्श मतदान केंद्र ( मॉडेल बूथ सेंटर) यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य ठरणार आहे.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या आयोगाचा हा अनोखा, कल्पक प्रयोगच म्हणावा लागेल.प्रत्येक जिल्हा किंवा ४८ लोकसभा मतदारसंघात ठराविक आदर्श( मॉडेल) मतदान केंद्र राहणार आहे. आदर्श व सुसज्ज मतदान कसे राहावे याची ही केंद्रे आदर्श उदाहरण राहणार आहे. सुशोभित, आकर्षक अश्या या केंद्रात पेयजल, प्रसाधन गृह, अपंगांसाठी ‘व्हील चेअर’, रॅम्प वॉक’ आदि सुसज्ज सुविधा राहणार आहे. सखी मतदान केंद्र अथवा ‘पिंक बूथ’ मध्ये नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी महिलाच राहणार आहे. यामध्ये अगदी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सहायक ते पोलिसही महिला कर्मचारी असा सरंजाम राहणार आहे.
राजस्थान मधील ‘पिंक सिटी’ अर्थात जयपूर ची आठवण करून देणाऱ्या या केंद्रात गुलाबी वातावरण राहणार आहे. गुलाबी रंग किंवा त्यामधील छटा( शेड्स) वापरण्यात येतील.आदर्श केंद्रात दिव्यांग मतदान केंद्र सुद्धा राहणार आहे. या केंद्रात नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी दिव्यांग राहणार आहे. मोठ्या संख्येतील युवा मतदारांना प्रोत्साहित करण्याच्या उद्धेशाने युवा मतदान केंद्र राहणार आहे. यामध्ये युवा अधिकारी व कर्मचारीच नेमण्यात येणार आहे. ही आदर्श केंद्रे मतदानाचे वैशिष्ट्य राहणार असून ती लक्षवेधी ठरणार आहे.
हेही वाचा >>>रुग्णाला स्ट्रेचरवर लावले व्हेंटिलेटर, रुग्ण पाच तासांपूर्वीच दगावला; तरीही डॉक्टरांनी…
राज्यातील ४८ मतदारसंघातील मतदार संख्या, विधानसभा मतदारसंघ लक्षात घेऊन आदर्श केंद्रांची संख्या ठरविण्यात येईल किंवा आली आहे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीत आघाडीवर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात असे ५६ मॉडेल राहणार आहे. सात विधानसभेत प्रत्येकी १ प्रमाणे ७ सखी केंद्र, प्रत्येकी ६ नुसार ४२ युवा तर प्रत्येकी १ प्रमाणे ७ दिव्यांग केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.