गोंदिया: येत्या २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात विजया दशमी उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूरला जाता यावे यासाठी गोंदिया एस.टी. आगाराकडून सहा अतिरीक्त बसेसची सुविधा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरच्या दीक्षाभूमीवर आयोजित कार्यक्रमाला रेल्वे, बससह खासगी वाहनांनी हजारो लोक हजेरी लावतात. अशा परिस्थितीत येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी रेल्वे तसेच राज्य परिवहन विभागाकडून अतिरिक्त व्यवस्था करण्यात येते. याबाबत गोंदिया एस.टी. आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी सांगितले की, गोंदिया आगारातून नागपूर व पुढे दररोज १९ बसेस धावतात. त्यात विजयादशमीच्या दिवशी प्रवासी मोठ्या संख्येने नागपूरला जातात. यावेळी बसेस कमी पडत असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.

हेही वाचा… खरीप गेला, आता रब्बी हंगामावर भिस्त; शेतकरी लागले कामाला

मात्र यंदा ही अडचण उद्भवू नये यासाठी धम्मचक्र प्रवर्तनदिनी गोंदिया आगारातून नागपूरसाठी ६ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रवासी संख्या वाढल्यास आणखी बसेस अन्य मार्गावरून वळवून नागपुरात पाठविण्याची तयारी आगार व्यवस्थापनाकडून करण्यात आली असल्याचेही संजना पटले यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना सांगितले.