लोकसत्ता टीम
नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेतर्फे मुंबई-नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे-नागपूर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. होळी सणानिमित्ताने मूळ गावी जाणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष गाडी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष या दोन्ही गाड्या ९, ११, १६ व १८ मार्चला चालविण्यात येणार आहे. दोन्ही गाड्यांना वर्धा, धामनगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे व दादर स्थानकावर थांबा राहणार आहे.
पुणे-नागपूर विशेष गाडी ११ व १८ मार्चला आणि पुणे-नागपूर विशेष गाडी १२ व १९ मार्चला चालविण्यात येणार आहे. ही गाडी पुणे येथून ३.५० वाजता प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपुरात दाखल होईल. नागपूर-पुणे विशेष गाडी १२ व १९ मार्चला आणि नागपूर-पुणे विशेष गाडी १३ व २० मार्चला धावले.या गाड्यांना उरुली, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगाव व वर्धा स्थानकावर थांबा राहणार आहे.
मुंबई (सीएसएमटी) – नागपूर सुपरफास्ट विशेष गाडी रविवार आणि मंगळवारी मुंबईहून रात्री ११.२० वाजता निघेल आणि नागपूरला दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. नागपुर – मुंबई (सीएसएमटी) सुपरफास्ट विशेष गाडी रविवार आणि मंगळवारी नागपूर येथून रात्री ८ वाजता निघेल आणि मुंबईला (सीएसएमटी) दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ही गाडी २४ डब्यांची राहणार आहेत. यामध्ये दोन ब्रेक व लगेज, चार सर्वसाधारण, चार शयनयान, एक एसी फर्स्ट क्लास, एक एसी फर्स्ट व सेकंड, दोन एसी सेकंड, १० थर्डी एसी, राहणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, जलगांव, भुसावल, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापुर, बडनेरा, धामनगांव, वर्धा येथे थांबणार आहे.
पुणे – नागपूर सुपरफास्ट विशेष गाडी पुण्याहून मंगळवारी दुपारी ३.५० वाजता निघेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. नागपूर- पुणे सुपरफास्ट विशेष गाडी नागपूरहून बुधवारला सकाळी ८ वाजता निघेल आणि पुण्याला रात्री ११.३० वाजता पोहोचेल. ही गाडी २० डब्यांची असणार आहे. या गाडीला उरूली, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, जलगांव, भुसावल, मलकापुर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामनगांव, वर्धा येथे थांबे आहेत.
© The Indian Express (P) Ltd