नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पर्याप्त औषध आहे, तर येथील डॉक्टर नातेवाईकांच्या हातात औषधांच्या चिठ्ठ्या का देतात? येथे मृत्यू का वाढले? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मेडिकलच्या अधिष्ठातांना जाब विचारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेकडून गुरुवारी नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील गैरसोयीबाबत निदर्शन करण्यात आले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना मनसेने विचारले की, मेडिकलमध्ये रुग्णांकडून औषधा बाहेरून आणायला लावल्या जात असल्याच्या तक्रारी आहे. त्यावर अधिष्ठातांनी पर्याप्त औषधी असल्याचे सांगितले. त्यावर संतप्त आंदोलक म्हणाले मग रुग्णांना डॉक्टर औषधांची चिठ्ठी का देतात.

हेही वाचा – चंद्रपूर महापालिकेतील नोकरीसाठी सादर केले बनावट अनुभव प्रमाणपत्र; दोघांविरोधात पोलिसांत तक्रार

हेही वाचा – भंडारा : वाघाची दुचाकीला धडक, मायलेक जखमी; नशीब बलवत्तर म्हणून…

मेडिकलला अस्वच्छता असून येथे मृत्यूही वाढताना दिसत आहे. मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालीटी रुग्णालयातील मेंदू शल्यचिकित्सा विभागातील प्राध्यापकासह इतरही मेडिकल, सुपरमधील अनेक प्राध्यापकांचे खासगी रुग्णालय आहे. ते शासकीय रुग्णालयातील रुग्ण तेथे पळवून नेतात. या प्रकरणाची चौकशीची मागणीही आंदोलकांनी केली. त्यावर अधिष्ठातांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान महिला आंदोलकांनी येथील गार्ड नातेवाईकांशी सौजन्याने वागत नाही. काही प्रकरणात नातेवाईकांना मारहाणही केली जाते यासह इतरही आरोप केले. मनसेच्या आंदोलनादरम्यान आंदोलक-अधिष्ठातांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांमध्ये मनसेचे शहर अध्यक्ष विशाल बडगे, चंदू लाडे, आदित्य दुरूगकर, दिलीप गायकवाड, उमेर बोरकर, शशांक गिरडे, गौरव पुरी, अंकित झाडे, प्रशांत निकम, उमेश उतखेड, चेतन बोरकुटे, अभिषेक माहुरे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adequate drug stock in medical hospital then why doctors give chits mns question mnb 82 ssb
Show comments