नागपूर : शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सत्ताधारी भाजप, एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांची कोंडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. अशातच मंगळवारी आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार अचानक विधानभवन परिसरात समोरासमोर आले. दोघांनी हस्तांदोलन करून शाहिरांसोबत फोटो सेशनही केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> अकोला जिल्ह्यात वंचितने वर्चस्व राखले!, राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे

विधानभवन परिसरात मंगळवारी सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची बैठक घेण्यासाठी आले होते. येथील काम आटपून उद्धव ठाकरे विधानभवन परिसरातून परत जाताना त्यांना सोडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे बऱ्याच नेत्यांसह माजी मंत्री आदित्य ठाकरेही आले होते. उद्धव ठाकरे परतल्यावर आदित्य ठाकरे विधानभवन परिसरात परतले. ते विधानसभेच्या दिशेने जात असताना रस्त्यात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार त्यांच्यापुढे आले. त्यांनी त्यावर मुनगंटीवार यांच्याशी थोडा संवाद साधत हस्तांदोलन केले. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पदाधिकारी होते.

हेही वाचा >>> ‘हॅलो…मी आत्महत्या करतोय! तुम्‍ही पोलीस आहात ना, मग मला शोधून काढा’; अमरावती पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा फोन

मुनगंटीवार यांनी शाहिरांसह फोटो काढायला आल्याचे सांगितले. त्यातच शाहिरांकडून आदित्य ठाकरेंनाही छायाचित्रासाठी विनंती केली. मुनगंटीवार यांनीही त्यावर आदित्य ठाकरेंना शब्द टाकला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही या फोटो सेशनमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर ते विधानसभेच्या दिशेने निघाले. दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यावर सत्ताधारी एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसताना हा प्रसंग बघून विधानभवन परिसरातील राज्याच्या राजकीय संस्कृतीचे सुंदर दर्शन सगळ्यांना बघायला मिळाले.