नागपूर : “हे खरे आहे की आम्हाला (मुंबई) वीज पुरवठा करण्यासाठी प्रदूषणाचा मार मात्र तुम्हाला सहन करावा लागतो”, तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पांच्या मुद्यावर हे वक्तव्य केले.
नागपूर येथे हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे त्यांनी पर्यावरणवाद्यांशी संवाद साधला. मुंबईकर आणि इतरांना वीज पुरवठा करण्यासाठी प्रदूषण मात्र वैदर्भीयांना सहन करावे लागते, असा मुद्दा सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे यांनी मांडला. आदित्य ठाकरे यांनी या मुद्यावर आपण शंभर टक्के सहमत असल्याचे सांगितले.
हेही वाचा – फडणवीसांच्या जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक
कोराडीतील वीज प्रकल्पांच्या प्रदूषणाबाबत आदित्य ठाकरे यांना पूर्ण कल्पना आहे. पर्यावरण मंत्री असताना त्यांनीच येथील राखबंधारा बंद करण्याचे आदेश दिले होते. याची आठवण करून देत लीना बुद्धे यांनी त्यांना प्रस्तावित नव्या प्रकल्पाची माहिती दिली. मुंबई आणि राज्यातील इतर परिसरातील वीज प्रकल्प बंद करून विदर्भात आणखी दोन संच येत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचा पर्यावरण मुल्यांकन अहवालदेखील कसा खोटा आहे, हेही त्यांनी सांगितले.