नागपूर: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे एक असे शेतकरी आहे, जे मंत्रालयात मुख्यमंत्री म्हणून बसतात. परंतु त्यांच्या शेतात दोन हेलिपॅड आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर जिल्ह्यातील नांदगाव, बखारीच्या गावकऱ्यांसी सोमवारी संध्याकाळी सरपंच आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. परंतु एक शेतकरी असे आहे जे मंत्रालयात मुख्यमंत्री म्हणून बसतात, ज्यांच्या शेतात दोन हेलिपॅड आहे. बाकी इतर शेतकऱ्यांच्या शेतात काही येत नाही.

हेही वाचा >>>नागपूर: आम्हालाही हवा सातवा वेतन आयोग अन् शासकीय लाभ; महाराष्ट्रातील हत्तींची मागणी

दरम्यान वाराडा, एसंबा येथील वाॅशरीजमुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या त्रासामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन करणार होते. परंतु आंदोलन रोखण्यासाठी शेतकऱ्यांना नगरपरिषदेच्या इमारतीत डांबून ठेवले. कोकणातील बारसुमध्ये पण उद्धव ठाकरे गेले असतांना तिथेही शेतकऱ्यांना घरात डांबून ठेवले होते जणू काही हे काश्मीर आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray criticism of chief minister eknath shinde mnb 82 amy