नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अनेक शहरी नक्षलवादीशी संबंधित संघटना सहभागी झाल्याचा दावा होता. त्यावर प्रत्युत्तर देत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लक्ष केले आहे. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे काय म्हणाले हे आपण जाणून घेऊ या.
आदित्य ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवादी असतील तर ते केंद्रीय गृहमंत्र्यांचे अपयश आहे. केंद्र व राज्य सरकारला हे माहीत होते तर ते आतापर्यंत काय करत होते, या नक्षलवाद्यांना त्यांनी का पकडले नाही? इतके दहशतवादी फिरत असतील तर ही चिंतेची आणि भीतीची बाब आहे. परंतु फक्त खोटे बोलून नागरिकांचे लक्ष भटकवण्याचा हा प्रयत्न आहे.
हेही वाचा – कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
हेही वाचा – शहांच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात, काँग्रेसचे विरोधात…
सध्या अन्न खात्यासाठी फडणवीस सरकारमधील मंत्र्यांमध्ये भांडण आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये प्रत्येकजण कमाईचा विचार करतो. सेवा करायची असेल तर विभागांमध्ये भांडण कशाला? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.