यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेचे (उबाठा) युवा नेते आमदार आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने येथील समता मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. नामांकनासाठी तीन दिवसांचा अवधी शिल्लक असताना, महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. मात्र उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या तीन सभा मतदासंघात झाल्या. आता तरुणांमध्ये आकर्षण असलेल्या आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या दोन युवा नेत्यांची जाहीर सभा उद्या मंगळवारी होणार आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांचीही जाहीर सभा २२ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या (उबाठा) वतीने देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते शदर पवार यांचीही सभा जिल्ह्यात घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीने सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांच्या सभाही जिल्ह्यात होणार असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – सामाजिक न्याय विभागात एकच अधिकारी दहा वर्षांपासून एकाच पदावर, पुन्हा नवीन कार्यभार…

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

जिल्ह्यात महाविकास आघाडीने जनतेपर्यंत पोहोचण्यात आघाडी घेतली असताना, महायुतीमध्ये अद्यापही उमेदवार कोण, यावरच घोडे अडले आहे. विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारीसाठी धडपड सुरू आहे. महायुतीत उमेदवार घोषित करण्यास विलंब होत असल्याचा पूर्ण फायदा महाविकास आघाडीने उचचला आहे. महायुतीत ज्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे ते नेते प्रचाराच्या नियोजनात व्यस्त आहेत. मात्र उमेदवारी कोणाला मिळेल, हे महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाचे नेते ठामपणे सांगू शकत नसल्याने शिवसेना (शिंदे गट), भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते हातावर हात देऊन बसले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे स्वयंचलित दूरध्वनी संदेशाद्वारे मतदारांशी भ्रमणध्वीनवरून संपर्क साधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.