वर्धा : पहिल्या दिवसापासून शिंदे फडणवीस सरकार घटनाबाह्य म्हणणाऱ्या आदित्यच्या बापाचेच पद घटनाबाह्य ठरत आहे, असे टीकास्त्र आमदार नितेश राणे यांनी आज सोडले. आर्वी येथे भाजपच्या मेळाव्यास आले असताना ते बोलत होते. तो पक्षप्रमुखच घटनाबाह्य असल्याने तेव्हापासून सुरू सगळं घटनाबाह्य ठरते. सर्व घटनाबाह्य करत असताना तुम्हाला सरकारवर बोलण्याचा अधिकारच राहिला नाही, अशी टीका राणेंनी केली.
हेही वाचा >>> शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत कॉंग्रेसच्या निर्णयाआधीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज
हेही वाचा >>> नागपूर : कवाडेंशी युती करताना विश्वासात का घेतले नाही?; आठवले गटाचे नेते भाजपला भेटणार
धनुष्यबाण हा मुळात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे. ‘ईडी’ कुणाच्या घरी उगीच चहा घ्यायला जात नाही. माहिती मिळाल्यावर ते चौकशी करतात. भ्रष्टाचार नसेल तर थयथयाट करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमची घरे तोडली. चुकीच्या केसेस लावल्या, अटक केली. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून नेत्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली. ते दोषी चालतात. आता ‘ईडी’ची चौकशी सुरू झाली तर थयथयाट करतात. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयास जे योग्य वाटते ते होते. त्यानुसार तारखा पडतात. त्यावर बोलणे उचित नाही, असे राणे यांनी सत्ता संघर्षावर न्यायालयात सुरू प्रक्रियेवर मतप्रदर्शन केले.