गडचिरोली : पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवतावाद अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आदिवासींसह इतर लोकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा बळजबरीने थोपविण्याचा घाट विद्यापीठाच्या वतीने रचण्यात आला आहे. सदर अध्यासन केंद्राला आमचा प्रखर विरोध असून १९ ऑगस्ट रोजी होणारा अध्यासन केंद्राचा उद्घाटन सोहळा आम्ही उधळून लावणार, असा इशारा आदिवासी युवा विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिला.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नसताना व सामाजिक कार्यात कोणतेही भरीव योगदान नाही. सत्ताधारी मंडळींना खूश करण्याकरिता विद्यापीठ प्रशासन संघाची विचारधारा गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून लोकांवर लादू पाहत आहेत. मात्र हे आम्ही खपवून घेणार नाही, असे आदिवासी युवा विकास परिषदेचे विनोद मडावी यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक गुलाब मडावी, वसंत कुलसंगे, जगदीश मडावी, माधुरी मडावी, सचिन भलावी, राज बन्सोड, प्रतीक डांगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!
Reaction from the education sector on UGC NEP implementation proposal pune news
आधी निधी द्या, मग स्वतंत्रपणे मूल्यमापन करा; यूजीसीच्या ‘एनईपी’ अंमलबजावणी प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रातून प्रतिक्रिया
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
Why is the establishment of the Higher Education Commission delayed print exp
उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?

हेही वाचा – सहकार क्षेत्रातील राजकारणात बच्‍चू कडूंची वाट बिकट

हेही वाचा – तलाठी पदे चार हजारांवर तर इच्छुकांची संख्या दहा लाखांवर

आधी डीडोळकर, आता उपाध्याय

काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य दत्ताजी डीडोळकर यांचे नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. आदिवासी कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर तो निर्णय रद्द करण्यात आला होता. आता जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अध्यासन केंद्रावरदेखील आदिवासी युवा परिषदेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Story img Loader