यवतमाळ : शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यात साठवून यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. महानगरांत जाऊन आणि महागडे कोचिंग क्लासेस लावूनच या परीक्षेत यश मिळविता येते, असा समज आहे. मात्र घरीच नियोजन करून चिकाटीने अभ्यास केला, त्यात सातत्य ठेवले, स्वत:वर विश्वास असला आणि यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहिल्यास एक दिवस नक्कीच प्रशासकीय सेवेत दाखल होता येते. हाच स्पर्धा परीक्षांचा ‘सक्सेस पासवर्ड’ आहे, असे मत यवतमाळात आयोजित स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत विविध सेवांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीने येथील महेश भवनमध्ये झालेल्या या कार्यशाळेत आयएएस डॉ. मनीष नारनवरे, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, आयकर विभागाचे उपायुक्त अनिल खडसे (आयआरएस), समता पर्व प्रतिष्ठानचे सेवानिवृत्त अभियंता मनोहर सहारे उपस्थित होते. प्रामाणिकपणे यश मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यास हव्या असलेल्या गोष्टींपासून कुणीच रोखू शकत नाही. ‘बी’ प्लॅन तयार ठेवून स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वत:मधील क्षमता ओळखावी, असे आवाहन आएएस डॉ. मनीष नारनवरे यांनी यावेळी केले. मूळचे यवतमाळ येथील असलेले डॉ. नारनवरे यांचे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. ‘एमबीबीएस’ ची पदवी मुंबई येथील जे. जे. मेडीकल कॉलजमधून मिळविली. ते २०१६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या तामिळनाडू येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सोशल मीडिया मोहमाया आहे. त्यापासून विद्यार्थ्यांनी दूरच राहावे, असा सल्लाही डॉ. नारनवरे यांनी दिला.
हेही वाचा >>>भावना टिपायला लेखक पोहोचला रेल्वे स्थानकात, पण पोलिसांनी उचलले अन….
जीवन जगण्यासाठी दररोज परीक्षा सुरूच असते. सातत्यपूर्ण वाचनाने जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. शॉर्टकर्टने कोणत्याही प्रकारचे करिअर घडत नाही, असे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड म्हणाले. ते २०१६च्या बॅचचे अधिकारी असून, पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण गडचिरोली जिल्ह्यात झाले. बीडीएसची पदवी सावंगी (मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयातून मिळविली. रूरल डेव्हलपमेंटची फेलोशिप मिळाल्यावर आसाम राज्यातील तिनसुक्या जिल्ह्यात तीन वर्षे काम करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी कधीही वेळ व्यर्थ घालवू नये, स्वत:च्या पायावर उभे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. सोशल मीडियातून स्वत:ची ओळख निर्माण करता येत नाही, त्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉ. बन्सोड यांनीही दिला.
हेही वाचा >>>स्पर्धा परीक्षा शुल्क वाढीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी!
विद्यार्थ्यांना स्वत:मधील पात्रता ओळखता आली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार आहेत. मात्र, त्यांच्यात आपण कुठेतरी कमी आहोत, हा न्यूनगंड असतो. यशस्वी व्हायचे असेल तर न्यूनगंड बाळगू नका, असे आवाहन आयकर विभागाचे उपायुक्त अनिल खडसे यांनी केले. राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील रहिवासी असलेले ‘आयआरएस’ अधिकारी खडसे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ‘यूपीएससी’चा गड सर केला आहे. निरक्षर असलेल्या आजीला शिक्षणाचे महत्व माहित होते. तिनेच उच्चशिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न जागविले. अभियंता असलेले खडसे यांनी पुणे येथे नोकरी करून त्यातून पैसे जमा केला. शिल्लक असलेल्या पैशांतून पुस्तके घेत अभ्यास केला. संकट काळात मित्र सोबत होते. यावेळी यवतमाळातील मित्रांसोबतच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. संविधान प्रास्ताविकेचे वाचन विनय मिरासे यांनी केले. प्रास्ताविक नीतेश मेश्राम यांनी तर संचालन प्रा. अंकुश वाकडे यांनी केले. कार्यशाळेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती.
हेही वाचा >>>वनविभाग पदभरतीलाही अखेर भ्रष्टाचाराचे ग्रहण? १९ लाखांचा दर, मोबाईल, बँकेचे चेक आणि….